Dental Care : फास्टफूड आणि गुटख्यामुळे दात कमकुवत होऊन पडण्याची शक्यता, वेळीच करा हे उपाय

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम फक्त पोटावरच नाही, तर दातांवरही होत असतो. दातांचं आरोग्य सांभाळायचं असेल ब्रश आणि टूथपेस्ट हे सजगपणे निवडायला हवेत.

Dental Care
फास्टफूड आणि गुटख्यामुळे दात कमकुवत होऊन पडण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गुटख्यामुळे दातांचं आरोग्य बिघडतं
  • फास्टफूडमुळे दात होतात कमकुवत
  • टूथपेस्ट निवडताना राहा सावध

Dental Care | आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आहारातील फास्टफूडचं प्रमाण वाढलं आहे. याशिवाय गुटखा खाण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. या दोन्ही गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच, मात्र तेवढाच वाईट परिणाम आपल्या दातांवरही होत असतो. गुटखा आणि फास्टफूडमध्ये असणाऱ्या घटकांमुळे दातांचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते. अगोदर आपले दात कमकुवत होऊ लागतात आणि वेळीच उपाय केले नाहीत, तर ते गळून पडण्याची शक्यता निर्माण होते. दातांचं आरोग्य नीट राखण्यासाठी उत्तम आहार आणि व्यायामाचा समावेश दैनंदिन आयुष्यात करण्याची गरज असते. मात्र जर फास्टफूड आणि गुटख्याच्या अतिसेवनामुळे दात खराब झाले असतील, तर काही उपायांनी दातांचं आयुष्य आणि आरोग्य वाढवता येतं. जाणून घेऊया अशाच काही उपायांविषयी. 

मेडिकेटेड टूथपेस्टचा करा वापर

जर फास्टफूड खाण्यामुळे दात कमकुवत झाले असतील तर मेडिकेटेड टूथपेस्टचा वापर करण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. यासाठी मेडिकेडट टूथपेस्ट 5 मिनिटांसाठी दातावर लावून ठेवा आणि त्यानंतर धुऊन टाका. या उपायानेदेखील मोठा दिलासा मिळू शकतो. 

प्रत्येक खाण्यानंतर ब्रश करा

जर दातांची काळजी घेतली नाही, तर त्यात भेगा पडायला सुरुवात होते. वैद्यकीय भाषेत याला ‘कॅरेज’ असं म्हणतात. कुठलेही अन्नपदार्थ खाताना ते दातांच्या भेगांमध्ये अडकून पडतात. त्यामुळे प्रत्येकवेळी काहीही खाल्ल्यानंतर ब्रश करणे आणि कोमट पाण्याने चूळ भरणे आवश्यक आहे. याचा दातांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि दीर्घकाळ दात मजबूत राहतात. 

अधिक वाचा - रूग्णवाहिकेसाठी लक्षात ठेवा 'हे' दोन नंबर, Emergency काळात येतील मदतीस

पांढऱ्या पेस्टचा करा वापर

दातांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर नेहमीच पांढऱ्या टूथपेस्टचा वापर करण्याचा सल्ला दंतवैद्य देतात. कुठल्याही इतर रंगाच्या टूथपेस्टमध्ये केमिकल असतं. या केमिकलमुळे दातांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. केवळ जाहीरातींना भुलून अनेकजण वेगवेगळ्या रंगाच्या पेस्ट विकत घेतात. मात्र त्याचा दातांच्या आरोग्यावर दूरगामी आणि विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Weight Loss Tips : व्यायाम करायला मिळत नाही वेळ? ब्रश करताना करा Work Out आणि पहा फरक

ब्रश निवडताना सावधान

आपल्या ब्रशची निवड करताना ती सावधपणे आणि सजगपणे करण्याची गरज असते. दातांच्या आरोग्यासाठी सॉफ्ट ब्रश हा योग्य मानला जातो. त्यामुळे दातांवरचं आवरण सुरक्षित राहतं आणि सफाईदेखील होते. दातांवर अधिक जोराने घासल्यामुळे या आवरणाला धोका पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे दातांची सेन्सेटिव्हिटी वाढून दात दुखण्याची शक्यता निर्माण होते. 

अधिक वाचा - भारतातील प्रथम सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस HPV ला DCGI ची मान्यता, कधी होणार उपलब्ध?

डेंटिस्टच्या सल्ल्याने निवडा टूथपेस्ट

बाजारात मिळणाऱ्या बहुतांश टूथपेस्टमध्ये निकोटेक्स नावाचा घटक असतो. तंबाखुपासून होणाऱ्या आजारांना या घटकामुळे चालनाच मिळते. बाजारात असे काही दंतमंजन मिळतात, ज्यामुळे दातांचं दुखणं थांबतं. त्यात असणाऱ्या निकोटिक्समुळे हे होतं. मात्र हा दातांचं दुखणं थांबवण्याचा तात्पुरता उपाय असून त्याचे दीर्घकालीन वाईट परिणाम दातांवर होत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे दंतमंजन आणि टूथपेस्ट यापासून सावध राहणंच चांगलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी