मुंबई: अनेकदा लोकांना आपल्या टकलेपणामुळे(baldness) समाजात मान खाली घालावी लागते. काहींचा यामुळे कॉन्फिडन्सही जातो. थायलंडच्या(thailand) शास्त्रज्ञांनी(scienti असा दावा केला आहे की त्यांना असे औषध मिळाले आहे ज्यामुळे टक्कलपणावर उपचार केले जाऊ शकतात. शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की मॅन्ग्रोव्हच्या झाडापासून एक अर्क मिळवण्यात आला असून ज्यामुळे टक्कलपणावर उपचार केले जाऊ शकतात. शास्त्रज्ञांनी ५० लोकांवर यशस्वीरित्या क्लिनिकल ट्रायलही केली. ही झाडे समुद्र तटावर उगवतात.
खारफुटीच्या या अर्काला एविसेनिया मरिन नावाने ओळखले जाते. यात प्रामुख्याने रासायनिक अॅविसेक्विन सी असते. हे एक अॅक्टिव्ह कंपाऊंड एन्झाईम असते जे केस गळती रोखण्यास मदत करतात. यामुळे टक्कलपणास कारणीभूत ठरणाऱ्या हार्मोनचा स्तरही कमी होतो. संशोधकांना आशा आहे की या औषधामुळे टक्कलपणाने ग्रस्त असलेल्या लोकांना पुन्हा केस उगवण्यास मदत मिळेल.
या रिसर्चदरम्यान शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की त्यांनी ५० लोकांवर यशस्वी चाचणी केली. ज्यात दिसून आले की खारफुटीचा अर्क केसांची गळती रोखण्यास मदत करते. तसेच केसांच्या वाढीसही मदत करते. थायलंडच्या चुललॉन्गकोर्न विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गेल्या अनेक वर्षांपासून यावर अभ्यास केला आहे. त्यांना नुकताच राष्ट्रीय अनुसंधान परिषद थायलंडचा एक पुरस्कारही मिळाला आहे.
टक्कलपणाने ग्रस्त असलेल्या ५० पुरूष आणि महिलांवर हा प्रयोग करण्यात आले. या लोकांना हा अर्काचा लेप दररोज डोक्यावर लावण्यासाठी सांगण्यात आला. नियमितपणे या ५० लोकांचे डोक्याचे फोटो घेतले जातहोते. यात सहभागी झालेल्या लोकांच्या डोक्यावर केस उगवताना दिसले.
चुललॉन्गकोर्न विदयापीठाचे फार्माकॉग्नंसी अँड फार्मास्युटिकल बॉटनीचे प्रोफेसर वांचाय डेनामककुल म्हणाले,केस गळती रोखण्यासोबतच हे औषध केसांच्या वाढीसही प्रोत्साहन देते. एका खासगी कंपनीने याच्या उत्पादनासाठी टेक्निकल पेटंटही केले आहे. यानंतर सहा महिन्यात हे औषध बाजारात उपलब्ध होऊ शकते.