कॅन्सरपासून वाचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग; तीस मिनिटे चाला अन् टाळा वजन वाढीसह कॅन्सरचा धोका

जेवण केल्यानंतर थोडं चालणं हे शरिरासाठी खूप फायदेशीर आहे. एका संशोधनात असं म्हटलं आहे की, आपल्या शरिराच्या क्षमतेनुसार, जेवनानंतर १० ते३० मिनिटे चालणे खूप लाभदायक आहे.

The easiest way to survive cancer
कॅन्सरपासून वाचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • १० ते ३० मिनिटे चालणे आहे आरोग्यासाठी चांगले
  • चालणे दूर करू शकते कॅन्सर
  • जेवणानंतर चालल्याने सुधरते पचनक्रिया

नवी दिल्ली : जेवण केल्यानंतर थोडं चालणं हे शरिरासाठी खूप फायदेशीर आहे. एका संशोधनात असं म्हटलं आहे की, आपल्या शरिराच्या क्षमतेनुसार, जेवनानंतर १० ते३० मिनिटे चालणे खूप लाभदायक आहे. चालण्यामुळे कॅलरी नष्ट होते आणि वजन नियंत्रणात राहते. दरम्यान अजून काही फायदे होतात त्याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. (The easiest way to survive cancer Walk for 30 minutes and avoid the risk of cancer with weight gain)

पचनक्रिया होईस व्यवस्थित 


जेवण केल्यानंतर काही वेळा चालण्याने अन्नाचे पचन चांगले होते. जेव्हा शरिरांची हालचाल होते, तेव्हा अन्नाची हालचाल जलद होत असते, याचा परिणाम हा पचनक्रियेवर होत असतो.याशिवाय पेप्टिक अल्सर, छातीतील जळजळ, पोटातील पेटके आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
 

ब्लड शुगर राहिल नियंत्रणात 

 

जेवल्यानंतर शरिराची हालचाल झाल्याने ब्लड शुगर वाढण्याचा धोका कमी होतो. २०१६ मधील एका रिसर्च मध्ये  सांगण्यात आलं होतं की, जेवण्यानंतर १० मिनिटे जरी आपण चाललो तर ब्लड शुगर नियंत्रणात येते.

 


हृदय रोगांचा धोका होतो कमी


शारिरीक हालचालीमुळे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की, १० मिनिटांचे चालणे हे हृदय सुरक्षित ठेवू शकते. 

वजन राहतं नियंत्रणात


कॅलरी नष्ट झाल्यानंतर वजन वाढण्याचा धोका राहत नाही. परंतु लक्षात ठेवा दररोज मसाला आणि तेलगट पदार्थ खाण्यापासून दूर रहा. 

रक्तदाब वाढत नाही


नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थनुसार, १० मिनिटांचे चालणे हे रक्तदाब नियंत्रित ठेवत असते. तज्ञांच्या मते चालण्याचा वेग हा हळू असावा. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी