Figs Benefits: विवाहित पुरुषांची मिटवणार समस्या; रात्री दुधात मिसळून खा हे खास फळ, होणार अनेक फायदे

अंजीर (Fig) हे पोषक तत्वांचा (nutrients) खजिना आहे. याचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. शारीरिक दुर्बलता (Physical weakness) असो वा मानसिक दुर्बलता, सर्व समस्या दूर करण्यात प्रभावी ठरते.

Figs Benefits
विवाहित पुरुषांची मिटवणार समस्या;  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
 • अंजीराचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात.
 • हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करते.
 • अंजीर ही गुणधर्मांची खाण आहे, त्यात लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.

Figs Benefits: अंजीर (Fig) हे पोषक तत्वांचा (nutrients) खजिना आहे. याचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. शारीरिक दुर्बलता (Physical weakness) असो वा मानसिक दुर्बलता, सर्व समस्या दूर करण्यात प्रभावी ठरते. आयुर्वेदिक तज्ञ (Ayurvedic experts) म्हणतात की अंजीर हे असे फळ आहे जे कच्चे आणि पिकल्यानंतरही अशा दोन्ही खाऊ शकतो. अंजीर खाल्ल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. विशेष म्हणजे अंजीराच्या सेवनाने पचनसंस्थेची समस्याही दूर होते.

अंजीर म्हणजे काय?

अंजीरला इंग्रजीत Fig म्हणतात. या फळाचा रंग हलका पिवळा असतो, तर पिकल्यानंतर तो सोनेरी किंवा जांभळा असू शकतो. अंजीराचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. वास्तविक, अंजीरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करते. यासोबतच अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजेही या फळामध्ये आढळतात. 

अंजीर मधील पोषक तत्वे (Nutrients found in Figs)

अंजीर ही गुणधर्मांची खाण आहे, त्यात लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. यासोबतच कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि कॅलरीजही पुरेसे असतात, हे सर्व घटक निरोगी शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. 

विवाहित पुरुषांसाठी अंजीर फायदेशीर 

प्रख्यात आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी म्हणतात की अंजीराचे सेवन पुरुषांसाठी फायदेशीर मानले जाते.  याच्या नियमित सेवनाने पुरुषांची प्रजनन क्षमता आणि लैंगिक जीवन सुधारते. तसेच त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढते. सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी अंजीर देखील प्रभावी आहे, तुम्ही अंजीर दुधासोबत खाऊ शकता. 

अंजीर खाण्याची योग्य पद्धत कोणती? (What is the right way to eat figs)

 • सर्वप्रथम चार सुके अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
 • भिजवलेल्या अंजीराचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा 
 • तुम्ही झोपताना दुधात मिसळूनही सेवन करू शकता.

अंजीर खाण्याचे फायदे- Figs Benefits

 • पोट बराच काळ भरलेले राहील. 
 • हृदयाशी संबंधित समस्या दूर होतील.
 • मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर.
 • रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी
 • महिलांना हार्मोनल समस्या आणि मासिक पाळी येण्याची समस्या येत नाही.
 • तसेच वजन कमी करण्यास मदत होत असते. 

Disclaimer:या माहितीची अचूकता, समयसूचकता आणि सत्यता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. मात्र, ही टाइम्स नाऊ याची नैतिक जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी