Heart Attack Risk : सी ला कितीवेळा जाता त्यावरुन सांगता येणार भविष्यातील हार्ट अटॅकचा धोका

हृदयविकाराचा (heart disease) झटका अचानक येतो, म्हणूनच तो खूप धोकादायक ठरतो. पण त्याच्या धोक्याचा आगाऊ अंदाज लावण्यासाठी शास्त्रज्ञ (scientist) अहोरात्र काम करत आहेत. दरम्यान शास्त्रज्ञांनी यावर एक शोध लावला असून तुम्ही आधीच भविष्यातील हार्ट अ‍ॅटकचा धोका जाणून घेऊ शकता.

The risk of future heart attack can be predicted by the frequency of Toilet
किती वेळा टॉयलेटला जाता यावरुन समजेल हार्ट अटॅकचा धोका   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संशोधनासाठी, 4,87,198 लोकांचा 10 वर्षे अभ्यास करण्यात आला आहे.
  • आठवड्यातून तीन वेळा पेक्षा कमीवेळा शौचालयात जाणे देखील इस्केमिक हृदयरोग, इस्केमिक स्ट्रोक येऊ शकतो.
  • दररोज शौचाला न जाणाऱ्यांनी देखील काळजी घ्यावी.

Heart Attack Causes : हृदयविकाराचा (heart disease) झटका अचानक येतो, म्हणूनच तो खूप धोकादायक ठरतो. पण त्याच्या धोक्याचा आगाऊ अंदाज लावण्यासाठी शास्त्रज्ञ (scientist) अहोरात्र काम करत आहेत. दरम्यान शास्त्रज्ञांनी यावर एक शोध लावला असून तुम्ही आधीच भविष्यातील हार्ट अ‍ॅटकचा धोका जाणून घेऊ शकता. हो, तुम्ही किती वेळा टॉयलेटमध्ये (toilet) जाऊन पोट साफ करता. हे लक्षात घेऊन आगामी हृदयविकाराच्या झटक्याबद्दल अगोदरच जाणून घेऊ शकता आणि प्रतिबंधात्मक उपाय करू शकता.  (The risk of future heart attack can be predicted by the frequency of Toilet)

अधिक वाचा  : तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी


शास्त्रज्ञांनी केलंय 10 वर्षे संशोधन

NCBI वर प्रकाशितवर प्रकाशित झालेल्या संशोधनासाठी, 4,87,198 लोकांचा 10 वर्षे अभ्यास करण्यात आला आहे. या लोकांचे वय 30 ते 79 वर्षे दरम्यान होते. संशोधनाच्या सुरुवातीला त्यांना कर्करोग, हृदयविकार किंवा पक्षाघाताचा कोणताही आजार नव्हता. 

वारंवार शौचालयात जाणे धोकादायक

संशोधनातून असे दिसून आले आहे की, जे लोक दिवसातून एकापेक्षा जास्तवेळा पोट साफ करतात त्यांना इस्केमिक हृदयरोग (कोरोनरी हृदयरोग) होण्याचा धोका जास्त असतो. या आजारामुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका सर्वाधिक येतो आणि अशा लोकांनी आपल्या हृदयाची अधिक काळजी घ्यावी.

अधिक वाचा  : दादा! sorry म्हणजे सॉरी नव्हे; काही तरी वेगळचं आहे हे प्रकरण

या आजारांचाही असतो धोका

जे लोक जास्तवेळा शौचास जात असतील त्यांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका असतो. दिवसातून अनेक आतड्यांसंबंधी हालचाल केल्याने हृदय अपयश, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, टाइप 2 डायबिटीज आणि क्रॉनिक किडनी डिसीजचा धोका वाढतो. 

अधिक वाचा  : तुमचा लूक सुंदर बनवणारे Latest Blouse Designs

पण शौचास कमी वेळा जाणंही असतं धोकादायक  

ज्याप्रमाणे वेळा शौचास गेल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे दररोज शौचाला न जाणाऱ्यांनी देखील काळजी घ्यावी. कारण, संशोधनात असे म्हटले आहे की, आठवड्यातून तीन वेळा पेक्षा कमीवेळा  शौचालयात जाणे देखील इस्केमिक हृदयरोग, इस्केमिक स्ट्रोक आणि दीर्घकालीन किडनी रोगाचा धोका संभवतो. हृदयरोगींना बद्धकोष्ठतेचा धोका जास्त असतो. ही समस्या उद्भवण्यामागे  द्रवपदार्थांचे कमी सेवन, चालणे किंवा शारीरिक हालचालींचा अभाव, औषधांचे सेवन, भूक न लागणे, फायबरयुक्त अन्नाचा अभाव आणि पचनसंस्थेमध्ये खराब रक्तप्रवाह इत्यादी कारणे असू शकतात.

अधिक वाचा  : पोरांनो सांगा मुलींना काय बरं आवडत? नाही माहीत मग हे वाचा

हृदयविकाराची ही लक्षणे अचानक दिसू शकतात

  • छाती दुखणे
  • श्वास लागणे
  • अंगदुखी
  • चक्कर येणे
  • मळमळ. 

स्त्रियांना असामान्य लक्षणे दिसत असतात.

तीव्र मान, पाठ किंवा हाताचा त्रास होऊ शकतो. काही हृदयविकाराचे झटके अनपेक्षितपणे येतात. बरेच लोकांना काही तास, दिवस किंवा आठवडे आधी दिसणारी चेतावणी चिन्हे आणि लक्षणे दर्शवतात. एनजाइना (छातीत दुखणे किंवा दाब) जी कायम राहते आणि विश्रांती घेऊन जात नाही, ही पूर्वसूचना असू शकते.

हृदयविकाराचा झटका का येतो?

जर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये वंगण कमी झालं, तर रक्त हृदयापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही. या अडथळ्यामुळे हृदयामध्ये रक्ताची कमतरता होऊन वेदना सुरू होतात. याला एनजाईना पेक्टोरिस म्हणतात. कधीकधी या सर्व परिस्थिती ऑक्सिजनमध्ये देखील अडथळा निर्माण होतो. जर हृदयाच्या आत रक्ताभिसरण थांबले तर तो भाग निष्क्रिय होतो. जर शरीर हा भाग पुन्हा सक्रिय करु शकत नसेल तर अशा स्थितीला हृदयविकार म्हणतात. 

डॉक्टरांकडे कधी जावे

जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा मळमळ किंवा थंड घाम येणे यासारखी इतर लक्षणे असतील तर त्याने ताबडतोब आपत्कालीन विभागात जावे. लक्षणे गंभीर असल्यास, डॉक्टर रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञ किंवा हृदयरोग तज्ज्ञांकडे पाठवू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी