Heart Attack In Winter: हिवाळा (Winter) सुरू झाला आहे. हिवाळ्यात सर्दी (cold), ताप यांसारख्या आजारांचा (diseases) धोका वाढतो. पण तुम्हाला माहित आहे का की थंडीत या आजारांसोबतच हृदयविकाराचा (heart disease) धोकाही खूप वाढत असतो. म्हणूनच या ऋतूत हृदयाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तुम्ही या ऋतूत हृदयविकाराच्या जोखमीपासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता हे या लेखात आम्ही सांगणार आहोत. (The risk of heart attack is highest in winter, so take care of your health)
अधिक वाचा : द्रविड गुरूने सांगितलं भारतीय संघाच्या पराभवाचं खरं कारण
युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक लठ्ठ आहेत किंवा ज्यांचे वजन जास्त आहे. त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. याशिवाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी थंडीत स्वतःची अधिक काळजी घ्यावी कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 पटीने वाढत असतो.
अधिक वाचा : वास्तुशी संबंधित 'हे' 5 उपाय केल्यास घरात येते समृद्धी
हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो. उच्च बीपी रक्तादामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय थंडीत शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते. हिवाळ्यात, सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते कारण यावेळी तापमान खूप कमी असते. शरीराचे तापमान समान करण्यासाठी, रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
हिवाळ्यात सकाळी लवकर फिरायला जाऊ नका. चालायचे असेल तर ९ वाजल्यानंतर निघावे. जेवणात शक्य तितके कमी मीठ खा. व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून मीठ कमी खा. याशिवाय व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ याची पुष्टी करत नाही.)