Kareena Kapoor Weight Loss | प्रेग्नन्सीनंतर करीनाने असं कमी केलं वजन, रुटीन फॉलो करून मिळवली मनपसंत फिगर

अभिनेत्री करीना कपूरनं डिलिव्हरीनंतर ज्या वेगाने आपलं वजन कमी केलं, ते पाहून सगळेच थक्क झाले. करीनाने हा चमत्कार केला तो फक्त नियमित व्यायाम, साधा आहार आणि चिकाटीच्या जोरावर.

Kareena Kapoor Weight Loss
करीना कपूरने डिलिव्हरीनंतर घटवलं 14 किलो वजन  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • व्यायाम आणि डाएटचं रुटिन न चुकता फॉलो केलं
  • आहारात लिंबू, मध आणि जायफळाचा वापर
  • वजन घटवण्यासाठी खास प्रकारच्या योगाची मदत

Kareena Kapoor Weight Loss : करीना कपूर. फिल्म इंडस्ट्रीतील स्टाईल आणि फिटनेसचं दुसरं नाव. प्रेग्नन्सीनंतर करीना कपूरनं स्वतःला ज्या प्रकारे फिट ठेवलंय, ते पाहून तिच्याविषयी सर्वांचाच आदर दुणावला आहे. करीनाचं वय वर्षानुवर्षं तेवढंच कसं राहतं, असा प्रश्नही तिच्या चाहत्यांना सतत पडलेला असतो. मात्र यामागे आहे तिची मेहनत, सातत्य आणि चिकाटी. आपला फिटनेस कायम राखण्यासाठी करीना कपूरने प्रचंड मेहनत केली आहे. जाणून घेऊया, तिचा फिटनेस मंत्रा. 

आठवड्यातून 6 दिवस व्यायाम

करीना कपूर आठवड्यातून 6 दिवस व्यायाम करते आणि एक दिवस सुट्टी घेते. व्यायामासोबत मेडिटेशन आणि योगाचाही तिच्या शेड्यूलमध्ये समावेश असतो. विशेष म्हणजे डिलिव्हरीनंतर करीना कपूरनं एकूण 14 किलो वजन कमी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यासाठी तिनं एका खास योगा प्रकाराची मदत घेतली होती. ‘एरियल सिल्क योग’ असं त्या योगाच्या प्रकाराचं नाव. या प्रकारात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा प्रकारची आसनं, स्ट्रेचिंग आणि इतर व्यायामाचा समावेश असतो. त्याशिवाय स्वतःला फिट ठेवण्यासाठी करीनानं रनिंग, वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्वाक्ट्स आणि पुशअप्स असं व्यायामाचं सूत्र ठरवून घेतलं आहे. 

योगा झाल्यावर घेते खास ड्रिंक

करीना कपूर व्यायाम झाल्यानंतर हळद आणि गुलकंदमिश्रीत ड्रिंक घेते. याशिवाय ती लिंबू पाणीही पित असते. व्यायाम करताना थकवा जाणवला, तर ती फक्त पाणी पीत नाही. लेमनग्रास वॉटरमध्ये लिंबू आणि मध घातलेलं पेय तिला जास्त आवडतं. त्यामुळे डिहाड्रेशनपासून बचाव तर होतोच, शिवाय शरीरात ऊर्जादेखील तयार होते. माध्यमांत आलेल्या वेगवेगळ्या रिपोर्टनुसार करीना कपूरच्या दिवसाची सुरुवात दोन गोष्टींनी होते. एक म्हणजे भिजवलेले बदाम आणि दुसरं म्हणजे केळ. या गोष्टी खाल्ल्यावर काही मिनिटांनी करीना कपूर व्यायामाला सुरुवात करते. 

जेवणात असतात या गोष्टी

करीना कपूर शक्यतो घऱी तयार केलेलं अन्नच खाते. बाहेरचं खाणं टाळण्याकडे तिचा कल असतो. दुपारच्या जेवणात वरण, भात, चपाती, भाजी आणि दही यांचा समावेश असतो. याशिवाय दुपारी 3 वाजता ती फळं खाते. कधीकधी फळांऐवजी शेंगदाणे किंवा मकाणेही खाते. तिचं रात्रीचं जेवण अगदीच हलकं असतं. त्यात सूप आणि सॅलड यांचा समावेश असतो. रात्री 8 वाजण्यापूर्वीच ती जेवण उरकून घेते. तर झोपताना ती हळद आणि जायफळ घातलेलं दूध घेते. जायफळामुळे झोपेचा दर्जा सुधारतो आणि गाढ झोप लागत असल्याचा तिचा अनुभव आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी