Mudras for Fertility: प्रजनन शक्ती कमी होत असेल तर करा ही 3 योगासने

Mudras for Fertility: चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे महिलांमध्ये बीजांड आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते. यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. याशिवाय अशी काही योगासने आहेत, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते.

there is a decrease in fertility, so do these 3 yogasanas it will be beneficial
Mudras for Fertility: प्रजनन शक्ती कमी होत असेल तर करा ही 3 योगासने (सौजन्य: iStock) 
थोडं पण कामाचं
  • प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उषा मुद्रा करा
  • योनी मुद्रामुळे प्रजनन क्षमता वाढेल
  • त्रिमूर्ती मुद्रा देखील फायदेशीर आहे

Mudras for Fertility: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे, अनेक प्रकारच्या आरोग्य (Health) समस्या  उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे प्रजनन (Fertility) क्षमता. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे महिलांमध्ये बीजांड आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. ज्यामुळे प्रजनन क्षमता देखील कमी होते. यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. याशिवाय अशी काही योगासने आहेत, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे महिलांना गर्भधारणा करणे सोपे होईल. (there is a decrease in fertility, so do these 3 yogasanas it will be beneficial)

या योगासनांमुळे गर्भधारणा करणे सोपे होईल

उषा मुद्रा

हे आसन करण्यासाठी, खाली बसा. नंतर दोन्ही हातांचे तळवे वरच्या दिशेला ठेवून बोटे एकमेकांत अडकवा. ही मुद्रा करताना उजव्या हाताचा अंगठा हा डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हलके दाबा. हा योगाभ्यास रोज १५ मिनिटे करा. यामुळे गर्भधारणेतील अडथळे दूर होतील.

अधिक वाचा: Smoking Addiction : स्मोकिंगचं व्यसन सहज सुटेल, रोजच्या आहारात खा या पाच गोष्टी

योनी मुद्रा

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सुखासनात बसावे. मग तुमचे शरीर सरळ ठेवा आणि खांदे थोडे सैल सोडा. यानंतर दोन्ही हात वर करा.
यानंतर अंगठा कानाजवळ ठेवा आणि तर्जनी डोळ्यांवर, मधले बोट नाकाजवळ, अनामिका ओठांच्या वर आणि करंगळी ओठाखाली ठेवा. नंतर नाकातून श्वास घ्या. नंतर दोन्ही हातांच्या मधल्या बोटाने दोन्ही नाकपुड्या बंद करा. नंतर आपल्या क्षमतेनुसार काही वेळ श्वास रोखून ठेवा. नंतर काही वेळ ओमचा उच्चार करताना हळूहळू श्वास सोडा.

अधिक वाचा: Turmeric Water benefits:सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने होतात हे फायदे

त्रिमूर्ति मुद्रा 

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीचा कणा सरळ ठेवा. नंतर आरामदायी स्थितीत बसा. त्यानंतर दोन्ही हातांचे तळवे हृदयाच्या मध्यभागी ठेवा. यानंतर, अंगठा आणि तर्जनी जोडून, ​​पंखांसारखे तळवे उघडा. त्यानंतर, तळवे आपल्या शरीराकडे आणून, आपल्या दिशेने वळा. हे अशा प्रकारे करा की तुमची तर्जनी खाली येईल. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि आरामात सोडा.

(टीप: या लेखातील टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्याचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी