Tips for sound sleep : गाढ झोप लागण्यासाठी करा हे 10 उपाय, या टिप्स करतील रात्र सुखाची

रात्री गाढ झोप लागत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. ही तक्रार काही सोप्या उपायांनी दूर होऊ शकते.

Tips for Sound Sleep
गाढ झोपेसाठी उपाय  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी उपाय करण्याची गरज
  • गरम पाण्याने अंघोळ केल्याचा होतो फायदा
  • झोपेपूर्वी दूध प्यायल्याने सुधारतो दर्जा

Tips for sound sleep | झोप हा प्रत्येकाच्या आरोग्याचा दर्जा ठरवणारा घटक. जोपर्यंत व्यक्तीला गाढ झोप लागते, तोपर्यंत त्याचं आरोग्य नीट असल्याचं मानलं जातं. गाढ झोपेचा संबंध हा जसा शारीरिक आरोग्याशी असतो, तसाच तो मानसिक आरोग्याशीही असतो. गाढ झोप झाली नसेल किंवा झोपेत सातत्याने व्यत्यय येत असेल तर त्यामुळे अनेक मानसिक विकारांनाही आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर अनेकांच्या आयुष्यात बदल झाला आहे. अनेकजणांपुढे नव्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांना तोंड देताना झोपेच्या दर्जावर परिणाम झाला आहे. मात्र आपल्या झोपेचा दर्जा पुन्हा सुधारणं सहज शक्य आहे. बघुया हे उपाय. 

1. योग्य उशीची निवड करा

झोपताना उशी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आपल्या गरजेपेक्षा छोटी किंवा मोठी उशी असेल तर त्याचा झोपेवर परिणाम होतो. तुमची उशी ही मानेला, डोक्याला, कानांना आणि खांद्यालाही आधार देणारी असेल, याची खातरजमा करा. नॅशनल स्लीप फाउंडेशननं केलेल्या सर्वेक्षणानुसार योग्य उशी निवडल्यामुळे दहापैकी सातजणांचा झोप न येण्याचा प्रॉब्लेम सुटल्याचं दिसून आलं आहे. 

2. कॅफिन टाळा

झोपण्यापूर्वी काही तास शरीरात कॅफिन जाणार नाही, याची खातरजमा करा. कॅफिन हे शरीराला सक्रीय ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे कॉफी किंवा कॅफिन असलेले कुठलेही पदार्थ झोपण्यापूर्वी खाऊ नका. कॅफिन शरीराला झोपेपासून परावृत्त करतं. 

3. दिवसा झोपणे टाळा

दिवसा झोपणाऱ्यांना रात्री गाढ झोप लागत नाही, असा अनुभव आहे. अनेकांना दुपारच्या वेळी डुलकी काढण्याची सवय असते. मात्र त्याचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. रात्रीची झोप न झाल्यामुळे दिवसा डुलक्या येऊ लागतात. त्यामुळे सतत थकवा जाणवतो. हे दुष्टचक्र मोडून काढणं गरजेचं असतं. दिवसा अजिबात न झोपल्याचा परिणाम लगेचच त्या रात्रीच्या झोपेवर दिसतो.

Tips for sound sleep

4. ॲरेमा थेरपी

ॲरेमो थेरपीचा वापर करून मसाज केल्यामुळे झोपेचा दर्जा सुधारतो. शरीर रिलॅक्स झाल्यामुळे झोपेची गुणवत्ता वाढायला मदत होते. या थेरपीत वेगवेगळ्या आयुर्वेदिक तेलांचा वापर केला जातो. याचे चांगले परिणाम शरीरावर तर होतातच, शिवाय त्यामुळे झोपेचा दर्जाही सुधारतो. 

5. झोपण्यापूर्वी अंघोळ करा

झोपण्यापूर्वी गरम पाण्यानं अंघोळ करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. युरोपियन जर्नल ऑफ अप्लाईड फिजिओलॉजीत प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार झोपण्यापूर्वी ज्यांना गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते, त्यांना अंघोळ न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक चांगली झोप लागते. विशेषतः उतारवयात झोपण्यापूर्वी केलेल्या अंघोळीचा चांगलाच फायदा होतो. 

अधिक वाचा - Superfit dadi at 53 : पन्नाशीत बनवले सिक्स पॅक ॲब्ज! डाएटमधून केली 3 पदार्थांची हकालपट्टी

6. ध्यान

ध्यान आणि स्ट्रेचिंग यामुळे शरीराला आराम मिळतो. जर मध्यरात्री जाग येत असेल तर काही वेळ उठून ध्यान आणि स्ट्रेचिंग केल्यामुळे पुन्हा दर्जेदार झोप लागू शकते. 

7. रात्री उशिरा खाणं टाळा

अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. मात्र जेवण्यापूर्वी दोन ते तीन तास अगोदर जेवण केलं, तर झोपेचा दर्जा सुधारत असल्याचं दिसून आलं आहे. पचनक्रिया पूर्ण झाल्यामुळे शरीर पूर्ण रिलॅक्स होतं आणि झोपेचा दर्जा सुधारतो. 

8. झोपण्यापूर्वी हळदीचं दूध उत्तम

झोपण्यापूर्वी हळद घालून दूध पिल्याचा चांगला फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. झोपेसाठी कारणीभूत असणारे अमिनो ॲसिड आणि मेलाटोनिन हे घटक दुधात मुबलक प्रमाणात असतात. 

अधिक वाचा - Bad Cholesterol कमी करणारे फळ, Heart Attack चा धोका होईल कमी

9. आहार सुधारा

अनेकांच्या आहारात अतिरिक्त तेल, मीठ आणि मांसाहार असतो. त्याचा परिणामही झोपेवर होतो. अतिरिक्त स्नॅकिंग करण्याची सवयदेखील झोपवर परिणाम करते. सतत लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी पिण्याचं प्रमाण वाढवलं तरी झोपेचा दर्जा सुधारू शकतो. 

10. झोपेच्या खोलीतील वातावरण

ज्या खोलीत तुम्ही झोपता तिथे पुरेसा अंधार, खेळती हवा आणि स्वच्छता असेल, याची काळजी घ्या. शक्यतो झोपण्याची जागा थंड असेल, याची काळजी घ्या आणि तिथं जास्तच प्रकाश येत असेल, तर झोपताना आय मास्क वापरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी