Mango Benefits: उन्हाळी हंगामातील हंगामी फळांपैकी जर लोक कोणत्याही फळाची सर्वाधिक वाट पाहत असतील तर ते आंबा आहे. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. तसेच हे आपले राष्ट्रीय फळ आहे. पौष्टिकतेने भरलेला आंबा आरोग्यासाठी फायदेशीर आहे, जर तुम्ही तो योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी खाल्ला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आज आपण आब्यासोबत काय खावे आणि काय खावू नये हे जाणून घेणार आहोत.(These 4 food combinations with mango can be dangerous)
आंबा खाण्याची योग्य वेळ म्हणजे ‘पोस्ट लंच. तुम्ही दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणादरम्यान स्नॅकिंग म्हणून आंबा खावू शकता. जर तुम्ही असे आंबे खाल्ले तर तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नॉर्मल राहिल. रिकाम्या पोटी आंब्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते.
रात्री उशिरा आंबे खाणे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाही.यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते आणखी धोकादायक ठरू शकते. रात्रीच्या जेवणानंतर मिष्टान्न म्हणून कधीही आंबा किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ खावू नका.
अधिक वाचा: Interesting facts: हे फळ पिकायला लागते 2 वर्ष, काही लोकं खाण्यास घाबरतात!
1. दही
आंबा आणि दही यांचे मिश्रण आजकाल एक परिपूर्ण मिष्टान्न म्हणून लोकप्रिय होत आहे. पण गरम आणि थंडचा हा मिलाफ तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतो. यामध्ये त्वचेच्या समस्या, शरीरात टॉक्सिन्स तयार होणे यांचा समावेश होतो.
2. कारले
या हंगामातील आणखी एक सुपरफूड म्हणजे कारले. खरंतर, कारले आणि आंबा हे दोन्ही पोषक तत्वांचे भांडार आहेत, परंतु दोन्ही एकत्र खाणे ही एक अस्वास्थ्यकर कल्पना असू शकते. कारल्यासोबत किंवा नंतर आंबा खाल्ल्याने उलट्या, मळमळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
अधिक वाचा: Weight Lose Tips: वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हाय प्रोटीन फूड डाएट प्लॅन
3. पाणी
आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटदुखी, अॅसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे आंबा खाणे आणि पाणी पिणे यामध्ये किमान अर्धा ते एक तासाचे अंतर ठेवा.
4. मसालेदार चाट
जर तुम्ही मँगो चाट मसाल्यात मिसळून बनवण्याचा विचार करत असाल तर हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आयुर्वेदानुसार मसाले आणि आंबा विरोधी स्वभावाचे आहेत. ते एकत्र खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर आंबा खाल्ल्यानंतर लगेच मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.