Sugarcane Juice Side Effects: या ४ लोकांनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस; आरोग्याचे होईल मोठे नुकसान

तब्येत पाणी
Updated Jun 02, 2022 | 12:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sugarcane Juice Side Effects । गरमीच्या दिवसात लोक शरीराला गारवा मिळावा यासाठी अनेक थंडपेय पित असतात. शरीरात थंडावा राहण्यासाठी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक लोक उन्हाळ्याच्या दिवसात ऊसाचा रस पितात.

These 4 people should not drink sugarcane juice by mistake
या ४ लोकांनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरीरात थंडावा राहण्यासाठी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक लोक उन्हाळ्याच्या दिवसात ऊसाचा रस पितात.
  • ऊसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  • ऊसाचा रस सर्वच लोकांसाठी फायदेशीर असू शकत नाही.

Sugarcane Juice Side Effects । मुंबई : गरमीच्या दिवसात लोक शरीराला गारवा मिळावा यासाठी अनेक थंडपेय पित असतात. शरीरात थंडावा राहण्यासाठी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक लोक उन्हाळ्याच्या दिवसात ऊसाचा रस पितात. हा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की ऊसाच्या रसामध्ये ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. (These 4 people should not drink sugarcane juice by mistake). 

दरम्यान, ऊसाचा रस सर्वच लोकांसाठी फायदेशीर असू शकत नाही. डाएट एक्सपर्ट म्हणतात की काही लोकांनी ऊसाचा रस पिल्याने त्यांचे नुकसानही होऊ शकते. जर तुम्ही लठ्ठपणा, सर्दी-आजारपण यांचा सामना करत असाल तर ऊसाचा रस तुमच्या समस्येत आणखी वाढ करू शकतो. 

अधिक वाचा : बुध ग्रह वक्र चाल संपवून वृषभ राशीत करणार संक्रमण

या ४ लोकांनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस

  1. अन्नविषबाधा (Food poisoning) असल्यास - जर तुम्हाला फूड पॉयजनिंग होत असेल तर ऊसाचा रस चुकूनही पिऊ नये. असे केल्यास या समस्येत वाढ होऊ शकते. दरम्यान अनेकवेळा ऊसाच्या हॅंडलवर माश्याही बसलेल्या असतात. यामुळे ऊसाचा रस अनहेल्दी होतो. त्यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. फूड पॉयजनिंगमध्ये ऊसाचा रस पिल्यास पोटदुखीचा त्रास जाणवू लागतो. 
  2. डोके दुखत असल्यावर - डोकेदुखी ही समस्या सामान्य आहे. अनेकवेळा थंड पेय पिल्याने डोके दुखते. त्यामुळे डोके दुखत असल्यावर ऊसाचा रस पिणे टाळावे. मात्र थोड्या प्रमाणात तुम्ही ऊसाचा रस पिऊ शकता. एक्सपर्ट म्हणतात की, डोके दुखत असताना ऊसाचा रस पिला तर डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्या उद्भवू लागतात. 
  3. ब्लड शुगर वाढल्यावर - डायबिटीज असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ऊसाचा रस प्यावा. कारण ऊसामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते, जे शरारीतील साखरेची पातळी वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि नवीन आजारांची समस्या डोके वर काढते. 
  4. सर्दी आणि खोकला होत असल्यावर - ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या आहे, त्यांनी ऊसाच्या रसापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. कारण ऊसाचा रस थंड असतो, सर्दी आणि खोकला यांच्यामध्ये वाढ होऊ शकते. ऊसाच्या रसामुळे घसा खवखवणे, श्लेष्मा निघणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. 

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी