Coronary Disease : नवी दिल्ली : भारतात हृदयरोगींची संख्या झपाट्याने वाढते आहे. याला लोक स्वतःच जबाबदार आहेत कारण ते त्यांच्या खाण्याच्या सवयींवर (Food Habits) नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हृदयविकाराची (Heart Disease) सुरुवात सर्वसाधारणपणे उच्च कोलेस्टेरॉलने होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे रक्त हृदयापर्यंत पोचण्यासाठी जोर लावावा लागतो. ज्यामुळे एखाद्याला उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागतो आणि नंतर हृदयविकाराचा झटका(Heart Attack), कोरोनरी धमनीचा आजार आणि ट्रिपल वेसल डिसीजचा सामना करावा लागतो. हे सर्व तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. हृदयाच्या आरोग्याला कशामुळे हानी पोहचू शकते हे जाणून घेऊया. (These 4 things increases risk of heart attack)
अधिक वाचा : Ind vs Zim: टीम इंडियाला भेटला नवा हिटमॅन, झिम्बाब्वेसमोर भारताचे २९० धावांचे आव्हान
1. सिगारेट आणि अल्कोहोल
अनेक तज्ज्ञ सांगतात की सिगारेट आणि अल्कोहोल आपल्या फुफ्फुसांचे आणि यकृताचे नुकसान करतात. हे बर्याच प्रमाणात खरे आहे, परंतु त्याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब, हार्ट फेल्युअर अशा समस्या उद्भवू शकतात. या वाईट सवयी जितक्या लवकर सोडा तितके तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि तुमच्या आरोग्यावरील धोका ठळेल.
2. सॉफ्ट ड्रिंक्स
अनेकदा आपण ताजेतवाने होण्यासाठी शीतपेयांचे सेवन करतो. परंतु त्यामध्ये सोड्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्या हृदयाला खूप त्रास होतो. याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.
3. तेलकट पदार्थ
भारतात तेलकट पदार्थांचा खूप ट्रेंड आहे. तेलकट पदार्थ खाताना कितीही स्वादिष्ट वाटले तरी ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्टेरॉल वाढते आणि परिणामी हृदयविकाराचा धोका वाढतो. तुम्हालाही फास्ट किंवा जंक फूड खायला आवडत असेल तर ते लगेच बंद करा.
4. प्रक्रिया केलेले मांस
हल्ली प्रोसेस्ड मीटचा म्हणजे प्रक्रिया केलेल्या मांसाहारी पदार्थांचा ट्रेंड खूप वाढला आहे. अनेकदा लोक प्रथिने मिळविण्याच्या इच्छेने मांस खातात. परंतु प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये मीठाचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. तीच पुढे हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनते.
अधिक वाचा : 5G Smartphone: म्हणून 5G Smartphone घेणे तुमच्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या 5G स्मार्टफोनचे फीचर्स
जेव्हा तुमच्या रक्तात जास्त कोलेस्टेरॉल (Cholesterol)असते तेव्हा उच्च कोलेस्टेरॉलची समस्या उद्भवते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉलची (High Cholesterol)लक्षणे दिसत नाहीत. कोलेस्टेरॉलमध्ये उच्च-घनता लिपोप्रोटीन (HDL) नावाचे चांगले कोलेस्टेरॉल, कमी-घनता लिपोप्रोटीन (LDL) नावाचे खराब कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्टेरॉल सारखे फॅटी पदार्थ ट्रायग्लिसराइड्स यांचा समावेश होतो. तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त आहे की नाही हे रक्त तपासणीवरून कळू शकते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह यांसारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात.
अलीकडच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे ही त्यातीलच एक समस्या आहे.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)