Sex Problems | या ५ सेक्स समस्यांना तोंड देतात जोडपी, मात्र कधीही करत नाही चर्चा

Sex Problems | शिवाय अपत्य प्राप्तीसाठी निरोगी सेक्स अतिशय महत्त्वाचा असतो. यासाठी जोडप्यांचे वैवाहिक जीवन (Healthy Sex life) हे निरोगी आणि तणावमुक्त असले पाहिजे. अनेकवेळा सेक्सशी संबंधिक समस्यांच्या (Sex problems) बाबतीत जोडपे एकमेकांशी मोकळेपणाचे चर्चा करत नाही. यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होऊन बसतो.

Sex Problems
सेक्सच्या समस्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सेक्सबद्दल अतिशय निरोगी दृष्टीकोनातून आणि खुल्या मनाने विचार करणे आवश्यक
  • अपत्य प्राप्तीसाठी निरोगी सेक्स अतिशय महत्त्वाचा
  • अनेकवेळा सेक्सशी संबंधिक समस्यांच्या (Sex problems) बाबतीत मोकळेपणाचा अभाव असतो

Sex Problems | नवी दिल्ली : सेक्स (Sex) हा जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. सेक्सवर जोडप्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य (Importance of Sex in Couple's life) अवलंबून असते. त्यामुळे सेक्सबद्दल अतिशय निरोगी दृष्टीकोनातून आणि खुल्या मनाने विचार करणे आवश्यक आहे. शिवाय अपत्य प्राप्तीसाठी निरोगी सेक्स अतिशय महत्त्वाचा असतो. यासाठी जोडप्यांचे वैवाहिक जीवन (Healthy Sex life) हे निरोगी आणि तणावमुक्त असले पाहिजे. अनेकवेळा सेक्सशी संबंधिक समस्यांच्या (Sex problems) बाबतीत जोडपे एकमेकांशी मोकळेपणाचे चर्चा करत नाही. यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होऊन बसतो. (These 5 are the commonly observed sex problems)

१. पुरुषांमधील वंध्यत्व

पुरुषांमधील व्यंध्यत्व हे प्राथमिकपणे शुक्राणुंच्या संख्येत घट झाल्याने किंवा त्यांची कार्यशीलता कमी झाल्याने येते. यामुळे जोडप्याला अपत्य प्राप्तीमध्ये अडचणी येतात. अलीकडे मोठ्या प्रमाणात पुरूषांना या समस्येला तोंड द्यावे लागते. मात्र जे लोक याला तोंड देत असतात ते याबद्दल चर्चा करत नाहीत.

२. शीघ्रपतन

शीघ्रपतन ही सेक्समधील अशी समस्या आहे जी पुरुषांना खूप अडचणीची ठरते. यामुळे जोडप्याला सेक्सचा पुरेपूर आनंद घेता येत नाही. शिवाय यामुळे पुरुषाला अपराधीपणाचे वाटते, त्यांच्या अहंकारालदेखील धक्का लागतो. ही समस्या मुख्यत: अशा पुरुषांमध्ये जास्त असते ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त असते. यावर मात करण्यासाठी योग्य आहार घेणे, जीवनशैली सुधारणे, चहा, कॉफी आणि मसालेयुक्त जेवण टाळले पाहिजे. कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते.

३. काम इच्छा कमी होणे

ही समस्या स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही आढळते. अलीकडच्या काळात यात मोठी वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली, वाढलेला ताणतणाव तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक घटकांमुळे ही समस्या निर्माण होते. त्यातही तणाव, धकाधकीचे जीवन आणि शारीरिक तंदुरुस्ती हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. याकडे लक्ष दिल्यास यावर मात करता येते.

४. महिलांमध्ये वंध्यत्व

अलीकडच्या काळात ही समस्या वाढली आहे. यासाठी व्यायाम, योगासने, योग्य औषधोपचार, योग्य आहार इत्यादी बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. तणावापासूनही दूर राहिले पाहिजे.

५. महिलांमध्ये यौन रोग

अलीकडे ही समस्या वाढली आहे. शरीरात उष्णता वाढल्याने याला तोंड द्यावे लागते. त्यामुळे योग्य औषधांबरोबरच योग्य आहारदेखील घेतला पाहिजे. शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.

बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव वाढला आहे, त्याचबरोबर लठ्ठपणा, फिटनेस अभाव दिसून येतो आहे. बैठे काम आणि शारीरिक हालचालींची कमतरता यामुळे तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असते. शिवाय फास्टफूड खाणे, अनावश्यक अन्नाचे सेवन करणे, तेलकट, मसालेदार अन्नपदार्थ खाणे इत्यादी सवयींचादेखील शारीरिक तंदुरुस्तीवर आणि परिणामी सेक्स लाइफवर मोठा विपरित परिणाम होतो आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी