How to make kidney healthy: आपल्या शरीरात दोन किडनी असतात. आपल्या रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचं, शरीरातील अतिरिक्त पाणी काढण्याचं आणि शरीरातील इतर साचलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम किडनी करते. हे टाकाऊ पदार्थ मूत्राशयात साठवतात ज्यातून ते मूत्रामार्गे बाहेर पडतात.
शरीरातील घाण काढून टाकण्यासोबतच किडनी इतरही महत्त्वाचे काम करते. रक्तदाब नियंत्रित करणे, लाल रक्तपेशी तयार करणे, हाडे मजबूत करणे हे काम सुद्धा किडनी करते. त्यामुळे किडनीच्या कार्यात अडथळा आल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आता प्रश्न असा आहे की, किडनी निरोगी कशी ठेवायची? पाच असे आयुर्वैदिक औषधी वनस्पती आहेत जे तुमची किडनी निरोगी ठेवण्याचं काम करु शकतात.
हे पण वाचा : ही पेय करतात तुमची किडनी डिटॉक्स
गिलॉय ही एक औषधी वनस्पती आहे जी किडनीला विषारी पदार्थांपासून वाचवण्याचं काम करु शकते. गिलॉयमध्ये अल्कलॉइड नावाचा घटक असतो जो किडनीचे संरक्षण करतो. याशिवाय गिलॉयमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात जे फ्री रेडिकल्स नष्ट करुन किडनीचे होणारे नुकसान रोखते.
हे पण वाचा : ही ओषधी वनस्पती केसांना लावा अन् जादू पाहा
हळद प्लाझ्मा प्रोटीनमध्ये सुधारणा करते आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये सीरम युरिया आणि क्रिएटिनिन लेवल कमी करते. हळदीचे सेवन केल्याने किडनीच्या कार्यात सुधारणा होते.
आलं हे असा कच्चा मसाला आहे जो खाद्यपदार्थांची चव वाढवतो आणि त्यासोबतच आरोग्याच्या असलेल्या अनेक समस्यांपासून दिलासा देतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी आल्याचे सेवन करा.
हे पण वाचा : असंख्य गुण असलेली शतावरी पुरुषांना देते जबरदस्त स्टॅमिना अन् पावर
अमलकी, हरितकी आणि बिभिटकी या तीन आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून बनलेले त्रिफळा हे किडनीच्या आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. हे किडनी मजबूत करते आणि त्याच्या कार्यातही सुधारणा करते.
या आयुर्वैदिक औषधी वनस्पतीमध्ये विविध गुणधर्म असतात. या आयुर्वैदिक वनस्पतीत लघवीचे प्रमाण वाढवण्याचे गुणधर्म आहेत तसेच किडनी साफ करण्यासही मदत होते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही. हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही औषधांचा वापर करण्याचा आम्ही सल्ला देत नाही. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)