Weight Loss Tips In Marathi | मुंबई : आहारावर लक्ष केंद्रित करण्याव्यतिरिक्त, जास्त असलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांसाठी व्यायाम हा एक उत्तम मार्ग आहे. व्यायाम कॅलरीज बर्न करते आणि वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. व्यायामाचे अनेक फायदे आहेत जसे की व्यायाम केल्याने चांगला मूड, मजबूत हाडे आणि अनेक जुनाट आजारांचा धोका कमी होतो. (These 5 exercises are effective for weight loss in women of all ages).
एकूणच आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. चांगले आरोग्य आणि वजन कमी होणे यांचा परस्पर संबंध आहे. पण जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा ते आणखी महत्त्वाचे बनते. जर तुम्ही जिमशिवाय वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही घरच्या घरी करू शकणार्या चांगल्या व्यायांमाद्वारे वजन कमी करू शकता.
अधिक वाचा : भांडुपमध्ये आज रंगणार राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार
म्हणूनच आज आपण अशाच काही व्यायामांबद्दल भाष्य करणार आहोत जे त्या महिलांसाठी खूप उपयुक्त आहेत ज्यांना जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. या व्यायामाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सर्व वयोगटातील स्त्रिया हे कुठेही आणि केव्हाही सहजरित्या करू शकतात. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिनचे इंस्टाग्राम पाहिल्यानंतर आम्हाला या व्यायामांबद्दल अधिक माहिती मिळाली.
* हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहावे लागेल.
* क्रिया पूर्ण करण्यासाठी एका पायाने मागे जा.
* नंतर पहिल्या स्थितीत परत या, पाय वाकवा.
* एक किक पूर्ण करा आणि सुरुवातीच्या स्थितीकडे परत या.
* शेवटी पुन्हा जुन्या स्थितीत या.
* हे करण्यासाठी, सर्वप्रथम हात आणि पाय जमिनीवर ठेवा.
* नंतर दोन्ही पाय लांब करून हात वर करा.
* डावा हात छताच्या दिशेने वर करा T असा आकार तयार करा.
* त्यानंतर तुम्ही खांद्यापासून टाचांपर्यंत सरळ, तिरकस रेषा तयार करावी.
* या क्रियेत ३० ते ६० सेंकद राहा, नंतर क्रियेत बदल करा.
* हा व्यायाम करण्यासाठी, पायांमध्ये थोडे अंतर ठेवून सरळ उभे राहा.
* आपले हात वरती करून दोन्ही बाजूंना तिरके करा.
* आता उडी मारून स्वत:ला क्रिस क्रॉस पोझिशनवर आणा.
* उडी मारताना आपले हात आणि दोन्ही पाय एकाच वेळी क्रॉस करा.
* ही क्रिया कमीत-कमी १०-१५ वेळा केल्यानंतर पहिल्या स्थितीत परत या.
* याचे १०-१० मिनिटांचे ३ सेट करा.
* हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर बसा.
* हात मागे ठेवा आणि गुडघे वाकवा.
* नंतर नितंब वर करा आणि उजव्या पायाने किक मारा.
* पाय बदला आणि त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
* एक आकार पूर्ण होईपर्यंत हे दुसऱ्या बाजूला पुन्हा करा.
* ही एक्सरसाइज करण्यासाठी चटईवर सरळ उभे राहा.
* मग स्क्वॅट्स करा आणि नंतर उडी घ्या.
* दुसऱ्या बाजूने स्विच करून अशीच क्रिया करा.
* ही क्रिया पुन्हा पुन्हा करा.