Diabetes Control : ही 5 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहेत वरदान...पाहा जबरदस्त फायदे

Blood Sugar control : मधुमेही रुग्णांनी (Diabetes) आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यांना किडनीचे आजार आणि हृदयविकारालाही सामोरे जावे लागू शकते. या आजारात योग्य आहार घेणे हे मोठे आव्हानच असते. अनेकवेळा औषधांपेक्षा तुमचा आहाराच (Diet)महत्त्वाचा ठरत असतो. मधुमेह हा अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे. याचे रुग्णाच्या शरीरावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक परिणाम होतात.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • मधुमेहात शरीरावर विपरित परिणाम होतात
  • मधुमेहींसाठी आहार महत्त्वाचा
  • मधुमेहींसाठी उपयुक्त हिरवी पाने

Green Leaves For Diabetic Patient:नवी दिल्ली : मधुमेह हा अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे. याचे रुग्णाच्या शरीरावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक परिणाम होतात. हा अतिशय चिवट आजार आहे. यात रुग्णाचे शरीर कमकुवत होते. मधुमेही रुग्णांनी (Diabetes) आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्यांना किडनीचे आजार आणि हृदयविकारालाही सामोरे जावे लागू शकते. या आजारात योग्य आहार घेणे हे मोठे आव्हानच असते. अनेकवेळा औषधांपेक्षा तुमचा आहाराच (Diet)महत्त्वाचा ठरत असतो. आपण अशा हिरव्या पानांबद्दल (Green Leaves) किंवा भाज्यांबद्दल जाणून घेऊया ज्या आपल्यासाठी नैसर्गिक इन्सुलिनचे काम करतात. त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रित करतात. (These 5 green leaves are useful in diabetes)

अधिक वाचा - Weather Change Sickness: सावधान! बदलणारा ऋतु घेऊन येतोय ‘हे’ गंभीर आजार, असा करा बचाव

मधुमेहींसाठी वरदान असलेली हिरवी पाने-

अश्वगंधा-
याला आयुर्वेदात मोठे महत्त्व दिलेले आहे. अनेक आजारांमध्ये अश्वगंधा फायद्याचे असते. अश्वगंधाच्या पानांच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित केली जाऊ शकते. या पानांचा वापर करण्यासाठी तुम्ही ही पाने उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर या पानांची बारीक पावडर तयार करा. ही पावडर  कोमट पाण्यात पावडर मिसळून प्यायल्याने मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित करता येते.

अधिक वाचा - Diabetes अन् Cholesterolसह 15 आजार दूर करते 'ही' भाजी, म्हटलं जातं ऑल इन वन औषधी वनस्पती

कढीपत्ता-
प्रत्येक भारतीय घरात वापरला जाणारा हा पदार्थ आहे. अनेक रेसिपीमध्ये कढीपत्त्याची पाने वापरली जातात. खासकरून दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरतात. मात्र ही पाने फक्त जेवणाला चव आणण्यासाठीच उपयुक्त नसतात तर ती मधुमेही रुग्णांसाठीदेखील खूपच गुणकारी असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की ही हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतात. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचा फायदा घेण्यासाठी रोज सकाळी काही कढीपत्ता चावून खाणे आवश्यक आहे.

मेथी-
मेथीची भाजी आपल्याकडे अनेकांना आवडते. याचे वैद्यकीय फायदेही खूप आहेत. मेथीच्या पानांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म भरपूर असतात. त्यामुळे त्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यांची पाने किंवा बिया खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास खूप मदत होते. 

आंबा-
आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे. मधुमेहींनी गोड खाऊ नये असे सांगितले जाते. मात्र आंब्याची पाने मधुमेहींसाठी गुणकारी असतात. या पानांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि पेक्टिन मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आंब्याची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतात. फक्त रक्तातील साखरेची पातळी पण कोलेस्टेरॉल देखील कमी करता येते. आंब्याची पाने पाण्यात उकळल्यानंतर हे पाणी रात्रभर राहू द्या आणि सकाळी गाळून प्या.

अधिक वाचा  : बिकिनी परिधान करुन 43 वर्षीय अभिनेत्रीने पाण्यात लावली आग

ओरॅगॅनो-
ओरेगॅनो हे देखील आरोग्यासाठी उपयुक्त असते. मधुमेहींसाठी हे खूपच फायद्याचे आहे. मधुमेही रुग्णांनी याचे दोन फायदे मिळतात. एकतर हे  स्वादुपिंडात अधिक इन्सुलिन तयार करण्याची क्रिया वाढवते. त्याचबरोबर ओरेगॅनोमुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी