स्वयंपाकघरातील या पाच नैसर्गिक गोष्टी वजन कमी करण्यासाठी आहेत अतिशय उपयुक्त

तब्येत पाणी
Updated May 01, 2021 | 11:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्या स्वंयपाकघरातील जडीबुटी आणि मसाले हे फक्त जेवणाचा स्वाद वाढवत नाहीत, तर ते पोषकतत्वांनीही भरलेले असतात आणि आपले आरोग्य चांगले राखतात. या 5 गोष्टी तर वजन कमी करण्यातही मदत करतात.

Spices
स्वयंपाकघरातील या पाच नैसर्गिक गोष्टी वजन कमी करण्यासाठी आहेत अतिशय उपयुक्त  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आहाराची चव वाढवण्यासोबतच आरोग्यदायीही असतात मसाले
  • स्वयंपाकघरातील हे सामान्य मसाले वजन करतील कमी
  • जाणून घ्या कोणते आहेत हे मसाले, कसे कराल यांचे सेवन

नवी दिल्ली: आपल्या स्वंयपाकघरातील (Kitchen) जडीबुटी (medicines) आणि मसाले (spices) हे फक्त जेवणाचा (meals) स्वाद (taste) वाढवत नाहीत, तर ते पोषकतत्वांनीही (nutrition) भरलेले असतात आणि आपले आरोग्य (health) चांगले राखतात. या 5 गोष्टी तर वजन कमी (weight loss) करण्यातही मदत (help) करतात. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत ज्यांचा योग्य वापर करून घेतल्यामुळे आपल्याला खूप फायदा (benefits) होऊ शकतो. जाणून घ्या अशा 5 घरगुती मसाल्यांबद्दल (herbal spices) ज्यांचा समावेश आपल्या आहारात (food) करून आपण आपले वजन कमी करू शकता.

काळी मिरची

काळी मिरची हा सामान्य मसाल्याचा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात असतोच. हा पदार्थ पायपर नायग्रम नावाच्या फुलापासून मिळतो. यात पिपराईन असते जो खूप आरोग्यदायी असतो. याचा थर्मोजेनिक प्रभाव शरीरात चरबीचा संग्रह होऊ देत नाही आणि चरबी लवकर बर्न होते. यासाठी आपण सरळ काळी मिरची चावून खाऊ शकता. पण याची चव फारच कडू असते, त्यामुळे सरळ चावण्याऐवजी आपण काळ्या मिरचीचा चहा तयार करून तो घेऊ शकता.

लाल मिरची

लाल मिरचीचा वापर सामान्यतः जेवणाला तिखटपणा आणण्यासाठी केला जातो. यामुळे आपल्या पाचनक्रियेला चालना मिळते. प्रत्येक स्वयंपाकघरात हमखास मिळणारा हा पदार्थ कॅपसायसिन नावाच्या तत्वातून उष्णता मिळवतो. यामुळे आपली भूक कमी होते आणि वजन घटते.

हळद

हळदीतील अँटीऑक्सिडंट गुणांबद्दल आपण सर्वांनीच खूप ऐकले आहे. घरातील मोठे लोक सर्दी झाल्यास किंवा जखम झाल्यास हळदीचा वापर करण्याचा सल्ला देतात. हीच हळद आपले वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त असते. हळदीत करक्यूमिन असते जे खूप आरोग्यदायक आहे. यामुळे चरबीचे ज्वलन होते आणि वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगाने होते.

दालचिनी

दालचिनी हा एक सुगंधित मसाला आहे जो सिनॅमन जनुकांच्या झाडांच्या आतील सालीतून मिळतो. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि यामुळे भूक कमी होते ज्यामुळे जाडेपणा कमी होण्यास मदत होते. रक्तातील शर्करेच्या स्तरावर याचे नियंत्रण राहते आणि एकूण प्रकृती उत्तम राहण्यासही मदत होते.

मेथीदाणे

मेथीदाणे हे घरी कायम असणाऱ्या मेथीच्या बियांच्या कुटुंबातील आहे. या पिवळ्या रंगाच्या बियांमध्ये 45 टक्के तंतूमय पदार्थ असतात ज्यामुळे कर्बोदके आणि चरबीच्या पचनाची प्रक्रिया मंदावते. दररोज 8 ग्रॅम मेथी खाल्ल्याने भूकही नियंत्रणात येते. आपण एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास गरम पाण्यात रात्रभर भिजवून ठेऊ शकता आणि सकाळी हे पिऊ शकता. किंवा मेथीच्या दाण्यांचा समावेश आपण आपल्या रोजच्या जेवणातही करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी