Blood Sugar Control : नवी दिल्ली : जीवनशैलीतील (Lifestyle)बदलांमुळे जे गंभीर आजार मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यात मधुमेह महत्त्वाचा आहे. रक्तातील साखर वाढल्यामुळे (Blood Sugar Level) हा आजार होता. हा अतिशय चिवट आजार आहे. असे मानले जाते की मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही तर फक्त नियंत्रणात ठेवला जातो. मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने हृदय, मूत्रपिंड, डोळ्यांचे नुकसान आणि पक्षाघाताचा त्याचबरोबर इतर आजारांचा धोका वाढतो. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी,तणावाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर व्यायाम आणि आहारदेखील महत्त्वाचा आहे. याद्वारे तुम्ही रक्तातील साखरेवर सहज नियंत्रण ठेवू शकता. (These 5 natural therapies help to recover from diabetes)
अधिक वाचा - दिवाळी सणाच्यावेळी वडोदरात उसळली जातीय दंगल
मधुमेहाच्या रुग्णांनी सावधपणे दिनचर्या अवलंबणे आवश्यक आहे. जीवनशैली आणि विचारात बदल करून तुम्ही साखरेवर सहज नियंत्रण ठेवू शकता. तज्ज्ञांच्या मते 5 नैसर्गिक पद्धती ज्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरतात त्याबद्दल जाणून घेऊया.
अनेकदा रुग्णांचे वजन वाढलेले असते. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजन कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मधुमेहांच्या रुग्णांमध्ये आहार महत्त्वाचा असतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वाढते वजन समस्या बनते. 5% वजन कमी केल्याने देखील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर, मीठ आणि चरबीचे सेवन मर्यादित केले पाहिजे. चुकीच्या दीनचर्येमुळे मधुमेह वाढतो आहे. यात वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे ठरते.
व्यायाम हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. त्यात तो मधुमेहात तर फारच महत्त्वाचा आहे. मधुमेही रुग्णांनी नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास औषधाशिवायही या आजारासह जीवन सहज जगता येते. शरीरातील इन्सुलिनचे प्रमाणदेखील व्यायामामुळे नियंत्रणात ठेवता येते.
अधिक वाचा - आज तुळशीचे पानं तोडणं आहे महापाप, जाणून घ्या कारण
मधुमेहींसाठी आहार खूपच महत्त्वाचा असतो. तुमच्या रोजच्या आहारात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर सर्व पोषक घटकांचा आहारात समावेश करा ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात कार्बोहायड्रेट टाळण्याचा सल्ला दिला जातो. स्टार्च, साखर आणि फायबर हे तीन मुख्य प्रकारचे कार्बोहायड्रेट्स अन्नात असतात. प्रक्रिया केलेले अन्न अजिबात खाता कामा नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.
तणाव हा अनेक आजारांचे मूळ असतो. मधुमेहातदेखील तणावाचा खूप गंभीर परिणाम होतो. तणावामुळे सर्व शरीरावर विपरित परिणाम होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे विविध हार्मोन्स सोडतात. ताणतणाव रोग वाढवतो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
अधिक वाचा- आजचे सूर्यग्रहण 'या' 4 राशींसाठी घेऊन येणार मोठी संधी, चमकणार नशीब
सर्वांसाठीच सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची आहे. कोणत्याही आजारातून बरे होण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आवश्यक असते. बरे वाईट प्रसंग मनाला लावून घेऊ नका. नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नका.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)