Bad breath remedies: हे ५ उपाय काढतील दात आणि हिरड्यांमधील सर्व घाण; तोंडातील दुर्गंधीपासून होईल सुटका

तब्येत पाणी
Updated May 27, 2022 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

How to get rid bad breath । तोंडातून दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे खूप लोक त्रस्त आहेत. साहजिकच ही एक गंभीर समस्या नाही पण तुमच्यासाठी लाजिरवाणी होऊ शकते.

These 5 remedies will remove all the dirt in the teeth and gums
हे ५ उपाय काढतील दात आणि हिरड्यांमधील सर्व घाण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तोंडातून दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे.
  • टॉन्सिल स्टोन अर्थात तुमच्या टॉन्सिलमध्ये छोटे पांढरे डाग असतात.
  • नाश्ता करणे हे तुमच्या शरीरासाठी दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे.

How to get rid bad breath । मुंबई : तोंडातून दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे खूप लोक त्रस्त आहेत. साहजिकच ही एक गंभीर समस्या नाही पण तुमच्यासाठी लाजिरवाणी ठरू शकते. असे मानले जाते की जगातील प्रत्येक चारपैकी एका व्यक्तीला याचा त्रास होतो. श्वासाची दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत आणि काही वेळा तोंडाच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणाऱ्यांनाही ही समस्या उद्भवू शकते. (These 5 remedies will remove all the dirt in the teeth and gums). 

अधिक वाचा : भरधाव कारने धडक दिल्याने हवेत उडाला वृद्ध, CCTVमध्ये कैद

तज्ञ मानतात की, तोंडांच्या स्वच्छतेची काळजी घेणे आणि तोंडाला हायड्रेट ठेवणे हा त्यापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमचा श्वास ताजा ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करू शकता, परंतु जर तुम्हाला ही समस्या नेहमीच होत असेल, तर तुम्ही क्षणाचाही विलंब न करता दातांच्या डॉक्टरांकडे जावे. 

अधिक वाचा : 'धाडसी' रमाई या एका चित्रपटामुळे आली जगासमोर

टॉन्सिलपासून मुक्त व्हा

टॉन्सिल स्टोन अर्थात तुमच्या टॉन्सिलमध्ये छोटे पांढरे डाग असतात. तोंडामध्ये आत लपलेले असल्याने ते क्वचितच दिसतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी येते कारण ते जीवाणूंची पैदास करतात आणि सूक्ष्मजंतूंनी बनलेले असतात. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही माउथवॉश, सफरचंद सायडर व्हिनेगरने गुळण्या करणे, कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे इत्यादी उपायांचा अवलंब करू शकता. 

नाश्ता करणे टाळू नका

नाश्ता करणे हे तुमच्या शरीरासाठी दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना जास्त दुर्गंधी येऊ शकते. श्वासाची दुर्गंधी आणि मजबूत दातांसाठी, नाश्त्यामध्ये कमी साखर असलेल्या गोष्टी खा तसेच सफरचंद, दही, दूध आणि सर्व प्रकारच्या फायबर युक्त गोष्टींचा नाश्त्यात समावेश करा. 

नेहमी नाकानेच श्वास घ्या

तोंडातून श्वास घेतल्याने ही समस्या उद्भवू शकते कारण ते लाळेचे उत्पादन थांबवते. म्हणून नेहमी नाकानेच श्वास घेणे हा एक चांगला पर्याय आहे, कारण ते आपण श्वास घेत असलेल्या हवेत आर्द्रता निर्माण करण्यास मदत करते. तोंडाने श्वास घेतल्याने हिरड्यांचे आजार, तणाव आणि चिंता यांसारख्या समस्या वाढू शकतात. 

जेवल्यानंतर आवश्यक पाणी प्या

मजबूत खाद्य पदार्थ, अन्न खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी येऊ शकते कारण त्यांची रसायने तुमच्या रक्तप्रवाहातून तुमच्या फुफ्फुसात जातात आणि तुमच्या श्वासाद्वारे बाहेर पडतात. त्यासाठी जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर आवश्यक तेवढे पाणी प्या.

दातांना फ्लॉस करा

दातांची दुर्गंधी हटवण्यासाठी डॉक्टरकडे जाणे फायदेशीर आहे, परंतु यासाठी तुम्ही दातांना फ्लॉस करू शकता. तुम्ही खाता-पिता तेव्हा बॅक्टेरिया दातांना चिकटू शकतात. त्यामुळे श्वासाची दुर्गंधी टाळण्यासाठी फ्लॉसिंग हा एक चांगला मार्ग असू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी