Diabetes Symptoms: ही ५ लक्षणे देतात डायबिटीजच्या धोक्याचा इशारा; आजच करा रक्तातील साखरेची चाचणी 

तब्येत पाणी
Updated Apr 28, 2022 | 17:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Early Symptoms of Diabetes । आजच्या धावपळीच्या जीवनात डायबिटीज ही केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठी समस्या बनली आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डायबिटीज हा आयुष्यभर त्रासदायक ठरणार आजार आहे. त्याचे टाईप १ आणि टाईप २ असे दोन प्रकार आहेत.

These 5 symptoms give the warning of the danger of diabetes
ही ५ लक्षणे देतात डायबिटीजच्या धोक्याचा इशारा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • डायबिटीज ही केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठी समस्या बनली आहे.
  • डायबिटीजचे टाईप १ आणि टाईप २ असे दोन प्रकार आहेत.
  • डायबिटीजच्या रूग्णांना सतत भूक लागते.

Early Symptoms of Diabetes । मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात डायबिटीज ही केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठी समस्या बनली आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डायबिटीज हा आयुष्यभर त्रासदायक ठरणार आजार आहे. त्याचे टाईप १ आणि टाईप २ असे दोन प्रकार आहेत. या आजाराचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. (These 5 symptoms give the warning of the danger of diabetes). 

अधिक वाचा : आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही,आहेत ते फक्त....

डायबिटीजच्या लक्षणांना कसे ओळखायचे? 

१) सतत भूक लागणे - डायबिटीजच्या रूग्णांना सतत भूक लागते. जर तुम्हाला देखील सतत भूक लागत असेल अथवा सतत काहीतरी खायची इच्छा होत असेल तर लगेच तुम्ही डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कारण सतत भूक लागल्याने डायबिटीजचा धोता उद्भवतो. 

२) तहान भागत नाही - जर तुमचा घसा सतत कोरडा पडत असेल,पाणी पिऊन देखील तहान भागत नसेल तर तुम्हाला देखील डायबिटीजचा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत तुम्हाला तुमच्या साखरेची चाचणी करणे आवश्यक आहे. 

३) सतत लघवी होणे - जर तुम्हाला रात्रीच्या वेळी चार-पाच वेळा लघवी करण्यासाठी उठावे लागत असेल, तर तुमच्या शरीरातील साखर तपासली पाहिजे. कारण ते एक डायबिटीजचे मोठे लक्षण आहे. 

४) वजन कमी होणे - तुमचे वजन अचानक झपाट्याने कमी होऊ लागले तर ते डायबिटीजचे लक्षण असू शकते, त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.

५) थकवा येणे - जर तुम्ही न थकता १० ते १२ तास काम करायचा, पण आता ८ तास काम केल्यावरही तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुम्ही डायबिटीजची तपासणी करून घेतली पाहिजे. 

डायबिटीजच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

लक्षणीय बाब म्हणजे त्रास जाणवत असलेल्या व्यक्तीने लक्षणांची वाट न पाहता डायबिटीजची तपासणी करून घेतली पाहिजे. कारण डायबिटीजच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे नक्कीच धोकादायक आहे. वयवर्ष ३० झाल्यानंतर वेळोवेळी डाबिटीजची तपासणी केली पाहिजे. कोणत्याही क्षणी स्वत:मध्ये डायबिटीजची लक्षणे दिसल्यास क्षणाचाही विलंब न करता डायबिटीजची तपासणी करून घ्यावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी