Weight Loss Tips: झोपण्यापूर्वी करा ‘या’ सहा गोष्टी, दहा दिवसांत कमी होऊ लागेल वजन

काहीजण जिममध्ये जाऊ घाम गाळतात, काहीजण मैदानात धावताना दिसतात, तर काहीजण योगा करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे सगळे प्रयत्न करूनही अनेकांना त्यात यश येत नसल्याचं दिसतं.

These 6 tips will help reduce body weight faster
‘या’ गोष्टींमुळे दहा दिवसांत वजन होईल कमी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • रात्रीचा आहार हलका असणं आवश्यक
  • झोपण्यापूर्वी घ्या वॉक आणि विनेगर
  • तणावावर अशी करा मात

Weight Loss Tips: बदललेली जीवनशैली (Lifestyle), खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (Eating habits) आणि अपुरी झोप (sleep) यामुळे गेल्या काही वर्षात लठ्ठपणाची समस्या वाढत चालल्याचं चित्र आहे. भारतात अनेकांना वाढत्या वजनाचा त्रास सतावत असून ते कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचं दिसतं. त्यामध्ये काहीजण जिममध्ये जाऊ घाम गाळतात, काहीजण मैदानात धावताना दिसतात, तर काहीजण योगा करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे सगळे प्रयत्न करूनही अनेकांना त्यात यश येत नसल्याचं दिसतं. काही मूलभूत गोष्टीत चुका केल्यामुळे हे घडत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यासाठीच अशा सहा गोष्टी आहेत, ज्यांचं नीट पालन केल्यामुळे वजन कमी (Weight Loss) होण्यास सुुरुवात होते. 

१. रात्री हलका आहार

रात्रीचं जेवण हे झोपण्यापूर्वी किमान दोन तास करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे जेवण पचायला मदत होते आणि रात्रभर पचननसंस्थेवर ताण येत नाही. त्याचप्रमाणं झोपण्यापूर्वी काही मिनिटे चालल्याचा वजन कमी होण्यासाठी फायदा होतो. 

२. झोपण्यापूर्वी विनेगर

रोज रात्री जेवण झाल्यानंतर काही वेळाने सफरचंदापासून तयार करण्यात आलेले विनेगर घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. त्यामुळे वारंवार भूकेची जाणीव होत नाही आणि कमी अन्न खाल्लं जातं. त्याशिवाय शरीर डिटॉक्स कऱण्यासाठी व्हिनेगरची चांगलीच मदत होते. 

अधिक वाचा - Garba Benefits: देशी डान्स गरबा आहे भन्नाट, वजन कमी करण्याच्या फायद्यासह होतात हे पाच फायदे

३. अल्कोहोलला रामराम

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अल्कोहोलला निरोप देणं गरजेचं आहेच, शिवाय वजन आटोक्यात आणण्यासाठीही आवश्यक आहे. तुम्हाला दररोज मद्यपान करून झोपण्याची सवय असेल, तर ती ताबडतोब सोडा. अल्कोहोलच्या माध्यमातून बऱ्याच कॅलरीज पोटात जात असतात. त्यामुळे वजन कमी होत नाही. 

४. मेडिटेशन

रात्रीचं जेवण झाल्यानंतर चालून येणं जितकं आवश्यक आहे, तितकंच आवश्यक आहे मेेडिटेशन करणं. मेडिटेशन करण्यामुळे तणाव कमी होते. वाढते ताणतणाव हेदेखील अनेकांचं वजन वाढण्यामागील कारण असतं. त्यामुळे इतर सर्व उपाय करूनही जर वजन कमी होत नसेल, तर ती व्यक्ती सतत कुठल्या ना कुठल्या तणावाखाली असण्याची शक्यता असते. आधुनिक काळात प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तणावाला सामोरं जावं लागतच असतं. हा तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशनचा उपयोग होतो. त्यामुळे झोप शांत लागते आणि झोपतही कॅलरी बर्न होतात. 

अधिक वाचा - Eating disorder among kids: या कारणांमुळे लहान मुलं होतात ‘इटिंग डिसॉर्डर’ची शिकार, ओळखा लक्षणं

५. झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि गाढ झोप लागते. झोपेचा दर्जा जितका उत्तम असेल, तितक्या अधिक प्रमाणात आपल्या शरीरातील कॅलरीज जळतात. 

६. चहा-कॉफी टाळा

अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे झोप निघून जाते आणि चयापचय क्रिया मंदावते. जर तुम्हीही हीच चूक करत असाल, तर वेळीच त्यात सुधारणा करा. 

डिस्क्लेमर - वेटलॉसबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्लाने उपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी