Vitamin D : या 9 लोकांमध्ये असते ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, अशी ओळखा लक्षणं

अनेकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते. मात्र ती ओळखता येत नाही. त्यासाठी काही साध्या लक्षणांवर लक्ष देण्याची गरज आहे.

Vitamin D
या 9 लोकांमध्ये असते ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • व्हिटॅमिन डी शरीरासाठी अत्यावश्यक
  • काहीजणांमध्ये असते कमतरता
  • लक्षणांवरून ओळखता येऊ शकते स्थिती

Vitamin D : व्हिटॅमिन डी (Vitamin D) हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या त्वचेचा (Skin) उन्हाशी (Sun) संबंध आल्यानंतर व्हिटॅमिन डीची निर्मिती होत असते. शरीरात असणारे कॅल्शिअम (Calcium) आणि फॉस्फरस (Phosphorus) यासारखी द्रव्यं शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. जर हे व्हिटॅमिन शरीरात मुबलक प्रमाणात नसेल तर आहारातील कॅल्शिअमचा शरीराला फायदा होत नाही. कारण ते शोषून घेण्याची क्षमताच कमी झालेली असते. शरीरातील हाडं (Bones) त्यामुळे ठिसूळ होऊ लागतात आणि आरोग्याशी संबंधित अनेक विकारांना सुरुवात होते. 

व्हिटॅमिन डीचे फायदे

व्हिटॅमिन डीचे अनेक फायदे आहेत. हाडं आणि स्नायू बळकट होणे, कॅन्सर, हृदयरोग, टाईप 2 डायबेटिक्स हे सगळे आजार रोगप्रतिकारक शक्तीशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंधित असतात. यासारख्या गंभीर आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढणे आणि हाडं मजबूत असणे यो दोन गोष्टींची गरज व्यक्त केली जाते. आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या अभ्यासानुसार व्हिटॅमिन डीचं शरीरात मुबलक प्रमाण असेल, तर गंभीर आजारांपासून संरक्षण मिळायला त्याची मदत होते. कोलन, प्रोस्टेट आणि स्तनांचा कॅन्सर रोखण्यासाठी व्हिटॅमिन डी फार मोलाची भूमिका बजावत असल्याचं दिसून येतं. 

कसं तयार होतं व्हिटॅमिन डी?

मानवी त्वचेवर रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतरच व्हिटॅमिन डी तयार होतं. जेव्हा त्वचा सूर्याच्या संपर्कात येते, तेव्हा 7-डीहायड्रोकोलेस्ट्रॉल नावाचं एक स्टेरॉईड नष्ट होतं आणि त्यापासून व्हिटॅमिन डीची निर्मिती होत असते. 

अधिक वाचा - Health Tips : औषधे घेताना चुकुनही करू नका या गोष्टींचे सेवन, आरोग्याला पोचेल हानी

कुणामध्ये असते व्हिटॅमिन डी ची कमतरता?

एकूण नऊ प्रकारच्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवत असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे. 

१. जे लोक सतत अंगभर कपडे घालतात आणि उन्हाशी कधीच शरीराचा संपर्क होऊ देत नाहीत.

२. जे लोक सनस्क्रीनचा अतिरिक्त वापर करतात. सनस्क्रीनच्या अतिवापरामुळे व्हिटॅमिन डी तयार करण्याची शरीराची नैसर्गिक प्रवृत्ती कमी होत जाते.

३. जे लोक घराबाहेर जास्त वेळ पडत नाहीत.

४. ज्यांच्या त्वचेचा रंग गडद असतो.

५. म्हाताऱ्या व्यक्ती. या व्यक्ती सहसा घरीच असतात. 

६. लठ्ठ लोक

७. ऑस्टियोपोरोसिस असणाऱ्या व्यक्ती

८. किडणीशी संबंधित विकार असणाऱ्या व्यक्ती

९. लिव्हरमध्ये दोष असणाऱ्या व्यक्ती

अधिक वाचा - Weight loss Tips in Marathi  : पनीर आणि अंड्यामुळे वजन कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

ही आहेत लक्षणं

शरीरात व्हिटॅमिन डी कमी आहे, हे सांगणारी काही लक्षणं आपल्या जाणवू लागतात. स्नायू दुखणे, सतत येणारा थकवा यासारख्या लक्षणांवरून व्हिटॅमिन डी ची कमतरता लक्षात येते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे डिमेंशियाकडे वाटचाल होण्याचीही शक्यता असते.

डिस्क्लेमर - ही सर्व सामान्य माहिती आहे. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी