Side Effect of Rusk : चहा किंवा कॉफीसोबत रस्क खाणे बंद करा, नाहीतर...

these are side effect of rusk, stop consuming rusk with tea or coffee otherwise… : नव्या संशोधनानुसार चहा किंवा कॉफीसोबत रस्क खाणे तब्येतीसाठी हानीकारक आहे.

Side Effect of Rusk
चहा किंवा कॉफीसोबत रस्क खाणे बंद करा नाहीतर...  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नव्या संशोधनानुसार चहा किंवा कॉफीसोबत रस्क खाणे तब्येतीसाठी हानीकारक
  • रस्कमध्ये कोणतेही पोषक घटक नाहीत
  • भूक भागल्याची जाणीव होत असली तरी प्रत्यक्षात रस्क खाल्ल्याने तब्येतीची हानी होते

these are side effect of rusk, stop consuming rusk with tea or coffee otherwise… : दररोज चहा किंवा कॉफी पिताना सोबत दोन किंवा तीन रस्क खाणे अनेकांना आवडते. रस्क खाल्ल्याने भूक भागते. शिवाय कुरकुरीत रस्क आणि गरम चहा किंवा कॉफी हे कॉम्बिनेशन जिभेचे चोचले पुरवते. पण नव्या संशोधनानुसार चहा किंवा कॉफीसोबत रस्क खाणे तब्येतीसाठी हानीकारक आहे. चहा आणि रस्क हे कॉम्बिनेशन तब्येतीसाठी सर्वाधिक धोकादायक आहे. 

रस्कमध्ये अतिरिक्त ग्लुटेन, रिफाइंड पीठ (रिफाइंड आटा), साखर हे घटक असतात. हे घटक तब्येतीसाठी हानीकारक आहेत. रस्क तयार करण्यासाठी ग्लुटेन, रिफाइंड पीठ (रिफाइंड आटा), साखर, रिफाइंड तेल, मैदा हे पदार्थ वापरले जातात. हे घटक वारंवार खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रास होण्याचा तसेच रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका निर्माण होतो. रस्कच्या निर्मितीसाठी वापरलेले घटक पोटाचे विकार, मधुमेह अशा समस्यांना कारणीभूत ठरण्याचाही धोका आहे. 

पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे

जे वारंवार रस्क खातात अशांमध्ये लठ्ठपणा, रक्तदाबाची समस्या, मधुमेहाची समस्या, पोटाचे विकार या समस्या आढळून येऊ लागल्या आहेत. रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्याचे एक कारण रस्क खाण्याची सवय हे पण आहे. 

Unhealthy food for kids: सावधान! मुलांना चुकूनही देऊ नका हे पदार्थ, पडेल महागात

रस्कमध्ये कोणतेही पोषक घटक नाहीत. यामुळे भूक भागल्याची जाणीव होत असली तरी प्रत्यक्षात रस्क खाल्ल्याने तब्येतीची हानी होते. शरीराचे पोषण होण्याऐवजी कुपोषण मोठ्या प्रमाणात होते. 

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे. Times Now Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी