World Vegan Day: या सेलिब्रिटींनी स्वीकारली आहे व्हेगन लाइफस्टाइल... फायदे जाणून व्हाल थक्क

Vegan Diet : 1 नोव्हेंबर हा जगभरात जागतिक व्हेगन दिन (World Vegan Day) म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण आणि प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी जग वेगन आहाराकडे जात आहे. शिवाय व्हेगन आहाराचे प्रचंड फायदे समोर येत आहेत. त्यामुळे बॉलीवूड सेलिब्रिटीही त्याचा अवलंब करण्यात मागे नाहीत. त्याचे फायदे जाणून घ्या.

Vegan Diet
वेगन आहार 
थोडं पण कामाचं
  • जगभरात वेगन जीवनशैलीचा प्रसार
  • अनेक सेलिब्रिटीदेखील घेतात वेगन आहार
  • पाहा वेगन आहाराचे फायदे

Vegan Lifestyle Update : नवी दिल्ली : व्हेगन जीवनशैली हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. जगभरात याचा प्रसार होतो आहे. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी व्हेगन जीवनशैली (Vegan Lifestyle), आहार-विहार अवलंबला जातो आहे. अगदी जगभरातील सेलिब्रिटीदेखील वेगन आहारावरच भर देत आहेत. व्हेगन आहार घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 1 नोव्हेंबर हा जगभरात जागतिक व्हेगन दिन (World Vegan Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 'द व्हेगन सोसायटी'ने 1994 मध्ये केली होती. पर्यावरणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्याचबरोबर प्राण्यांची पृथ्वीवर झपाट्याने हानी होते आहे. त्यामुळेच पर्यावरण आणि प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी जग वेगन आहाराकडे जात आहे. शिवाय व्हेगन  आहाराचे प्रचंड फायदे समोर येत आहेत. त्यामुळे बॉलीवूड सेलिब्रिटीही त्याचा अवलंब करण्यात मागे नाहीत. तुमच्या माहितीसाठी वेगन आहार (Vegan Diet) हा कोणत्याही सामान्य शाकाहारी आहारापेक्षा वेगळा असतो. वेगन आहाराचे पालन करणारे लोक प्राण्यांपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थही आहारातून पूर्ण वगळले जातात. या आहारात प्रामुख्याने हिरव्या भाज्या, फळे आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश होतो. (These celebrities follow vegan diet, know the benefits)

अधिक वाचा: WhatsApp Tips : WhatsApp Call Recording कशी करतात? जाणून घ्या खास टिप्स

व्हेगन आहार घेणाऱ्या सेलिब्रिटी -

1. लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री  अनुष्का शर्मा हेदेखील वेगन आहाराबाबत सर्वात पुढे आहेत. कोणत्याही खेळाडूने खेळण्यासाठी तंदुरुस्त असणे आवश्यक असते. त्यासाठी त्याच्या आहारात दूध, दही, अंडी आणि मांसाहाराचा समावेश करणे आवश्यक असते. मात्र या नियमाला छेद देत वेगन आहार घेत विराट कमालीचा तंदुरुस्त आहे. 

2. अभिनेता आर माधवन हा लोकप्रिय अभिनेता आहे. आज हा कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. आर माधवन वेगन आहाराचे पालन करतो. आर माधवन सजीवांवरील हिंसाचारावरही उघडपणे बोलतो.

अधिक वाचा: What girls search on Google: मुली एकट्या असताना गुगलवर काय सर्च करतात? वाचा, रिपोर्टमधील नोंदी

3. सोनाक्षी सिन्हा ही प्रसिद्ध अभिनेत्री आजकाल मोठ्या पडद्यावरुन थोडी गायब आहे. मात्र तीदेखील या वेगन आहाराचे पालन करते. ती आहारात कोणत्याही प्रकारचे प्राणीजन्य पदार्थ समाविष्ट करत नाही. ती मांसाहारापासून दूर पूर्णपणे दूर आहे.

अधिक वाचा : भारत-बांगलादेश सामन्याआधी शाकीबच्या विधानाने मोठी खळबळ

4. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लिसा हेडनदेखील वेगन आहे. तिचे सोशल मीडियावर मोठे फॉलोवर्स आहेत. लिसा तिच्या सोशल मीडियावर तिच्या आहाराशी संबंधित अपडेट्सही देत ​​असते. लिसा लहानपणापासून वेगन आहाराचे पालन करते. लिसा हेडनची आई देखील व्हेगन सोसायटीशी संबंधित होती.

आपल्या आहाराचा आणि आरोग्याचा मोठा संबंध असतो. तुंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. अलीकडच्या काळात जीवनशैलीत बदल झाल्यामुळे आहारात चुकीच्या सवयी आल्या आहेत. त्यामुळे आपण आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. एरवी सेलिब्रिटींचे अनुकरण करणाऱ्यांनी चांगल्या सवयींच्या बाबतीत देखील त्यांचे अनुकरण करण्यास हरकत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी