Dance Forms to Reduce Weight: या डान्स प्रकारांमुळे झपाट्याने वजन होईल कमी; जाणून घ्या सर्वाधिक कॅलरीज कशा बर्न होतात

तब्येत पाणी
Updated May 14, 2022 | 12:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dance Forms to Reduce Weight । डान्स आपला मूड सुधारतो त्यामुळे आपले शरीर लवचिक बनत जाते. यासोबतच डान्स केल्याने फुफ्फुस आणि हृदयाच्या संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

These dance methods will help you lose weight fast
या डान्स प्रकारांमुळे झपाट्याने वजन होईल कमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • : डान्स आपला मूड सुधारतो त्यामुळे आपले शरीर लवचिक बनत जाते.
  • फ्री स्टाईल नृत्य हे प्रामुख्याने वेगवान बीट गाण्यावर केले जाते.
  • दररोज ३० मिनिटे बेली डान्सचा सराव केल्याने तुम्हाला ३०० कॅलरीज बर्न करण्यात मदत होऊ शकते.

Dance Forms to Reduce Weight । मुंबई : डान्स आपला मूड सुधारतो त्यामुळे आपले शरीर लवचिक बनत जाते. यासोबतच डान्स केल्याने फुफ्फुस आणि हृदयाच्या संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. तुम्हाला डान्सच्या अनेक फायद्यांबाबत माहीती असेल. मात्र काही डान्स पद्धतींमुळे वजनही झपाट्याने कमी केले जाऊ शकते. एका अभ्यासानुसार, ४७ किलो वजनाची व्यक्ती एक तास हाय एनर्जी डान्स करून २४० कॅलरीज बर्न करू शकते. म्हणूनच जर तुम्हाला अनेक फायदे मिळवायचे असतील तर दररोज डान्स करा. यामुळे तुमचा मूड तर फ्रेश होईलच सोबतच तुमचे वजनही कमी होईल. (These dance methods will help you lose weight fast). 

अधिक वाचा : मुंबईत स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

फ्री स्टाइल डान्स (Free Style) 

यासाठी तुम्हाला कोणत्याही डान्स स्टेप फॉलो करण्याची गरज नाही, तर तुम्ही कोणत्याही तालावर डान्स करू शकता. फ्री स्टाइल नृत्य हे प्रामुख्याने वेगवान बीट गाण्यावर केले जाते, जिथे तुम्हाला शरीर मोकळे सोडून नृत्य करावे लागते. हा डान्सचा प्रकार तुम्हाला लवचिक राहण्यास आणि चांगल्या प्रमाणात कॅलरी बर्न करण्यास मदत करतो. जर तुम्ही ३० मिनिटे फ्रीस्टाइल नृत्य केले तर तुम्ही १८० कॅलरीज बर्न करू शकता.

साल्सा (Salsa) 

जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर साल्सा  हा एक उत्तम पर्याय आहे. हे सेक्सी आणि मादक लॅटिन अमेरिकन नृत्य दोन्ही पार्टनरचे कॅलरी बर्न करण्यास मदत करते. साल्सा म्हणजे हलणे, वाकणे आणि वळणे, जे तुमचे शरीर लवचिक बनवते. जर योग्य प्रकारे हा डान्स केला तर एक तास साल्सा केल्याने तुम्हाला ४२० कॅलरीज बर्न करण्यात मदत होऊ शकते.

बेली डान्स (Belly Dance) 

बेली डान्स करणे सोपे वाटू शकते, परंतु तुमच्या शरीराचे ठोके जुळवणे कठीण आहे. दररोज ३० मिनिटे बेली डान्सचा सराव केल्याने तुम्हाला ३०० कॅलरीज बर्न करण्यात मदत होऊ शकते. हे अरबी नृत्य तुमची पाठ, आणि पोट टोन करण्यात मदत करू शकते.

हिप-हॉप (Hip Hop)

हिप-हॉप नृत्य हे खास रोड स्टाइल नृत्य आहे, जे हिप-हॉप संगीताच्या तालावर सादर केले जाते. हा एनर्जी वर्कआउट व्यायाम तुम्हाला कॅलरी बर्न करण्यात आणि तुमच्या शरीराला टोन करण्यात मदत करू शकतो. दररोज ३० मिनिटे हिप-हॉप केल्याने आपल्याला ३०० कॅलरीज बर्न करण्यात मदत होऊ शकते. म्हणून तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हिप-हॉप नृत्य हा एक उत्तम पर्याय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी