Health tips for winter :नवी दिल्ली : हिवाळ्यात आरोग्याच्या (Health) काही समस्यांना आपल्या सर्वांनाच तोंड द्याव लागते. थंडीमुळे अनेकदा त्वचेच्या समस्या उद्भवतात तसेच शरीरात पाण्याचीही कमतरता निर्माण होते. अशावेळी त्वचेची खास काळजी (skin care)घेतली पाहिजे. हिवाळ्यात (winter) निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात बदल करणे गरजेचे असते. विशेष करून आपली त्वचा निरोगी राहावी यासाठी विविध पेयांचा (healthy drinks) समावेश केला पाहिजे. याचा फायदा त्वचेसाठी देखील होतो. त्याचबरोबर तुमचे एकूणच आरोग्य यामुळे चांगले राहते. अशक्तपणा, चयापचय, शरीरातील ऊर्जा यासारख्या बाबींवर ही पेय उपयुक्त ठरतात. थंडी वाढल्यामुळे आपण साहजिकच कमी पाणी पितो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. विविध पेयांचा समावेश केल्याने पाण्याची कमतरता पूर्ण होते आणि पोषक तत्वे देखील मिळतात. (These drinks will keep you healthy and hydrated in winter read in marathi)
अधिक वाचा : या आहेत 2023 मधील लकी राशी, होईल पैशांचा वर्षाव
सूप
विविध भाज्यांचा वापर करून सूप बनवता येते. या सुपाचा हिवाळ्यात खूप फायदा होतो. भाज्यांपासून बनलेला हा रस तुमच्या शरीरात पाण्याची आणि ऊर्जेची पातळी चांगली ठेवतो.
हिरव्या भाज्यांचा रस
हिवाळ्यात हिरव्या भाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. हिरवा भाजीपाला आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळेच या हिरव्या भाज्यांचा रस अनेक पोषक घटक देतो. यामुळे आपल्याला जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे मोठ्या प्रमाणात मिळतात. तुमची रोगप्रतिकारक्षमतादेखील यामुळे वाढते. शिवाय यामुळे त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते. हा भाज्यांचा रस तुम्ही दररोज घेऊ शकता.
अधिक वाचा - बायकांवर नवऱ्याकडूनच लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार, धक्कादायक आकडेवारीनं महिलांची वाढली चिंता
हर्बल टी
थंडीत चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मात्र चहा पिताना हर्बल चहा प्यायल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. शिवाय यातून आरोग्याचे फायदेदेखील मिळतात. हर्बल चहा प्यायल्याने रात्री झोपही चांगली येते. तणाव दूर करण्यास याचा उपयोग होतो. हर्बल चहामध्ये हिबिस्कस चहा, पेपरमिंट चहा आणि आल्याचा चहा इत्यादींचा समावेश असतो. या चहामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता, रक्तदाब, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर सूज येणे यासारख्या अनेक गोष्टींवर फायदा होतो.
अधिक वाचा - तरुणाचं अपहरण करुन 4 तरुणींनी केला सामूहिक बलात्कार, तरुणाच्या दाव्याने खळबळ
हळदीचे दूध
हळदीच्या दूधाचे महत्त्व तर आयुर्वेदातदेखील सांगितले आहे. आपल्याकडे तर प्रत्येक घरात हळदीचे दूध पिण्याची परंपरा आहे. एकतर दूधात कॅल्शियम आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यात हळदीचा औषधी गुणधर्म असतो. हळद अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त असते. त्यामुळे आरोग्यासाठी हळदीच्या दूधाचे मोठे फायदे असतात.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)