Healthy Lifestyle Mistakes: रोजच्या जगण्यात तुम्हीही या चुका करता का? वेळीच करा बदल

खाण्यापिण्याची आणि झोपण्याची सर्व पथ्यं सांभाळूनही आजारी पडत असल्याचे अनुभव अनेकांना येतात. त्यासाठी रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या काही चुका कारणीभूत असतात.

Healthy Lifestyle Mistakes
रोजच्या जगण्यात तुम्हीही या चुका करता का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दैनंदिन आयुष्यात होतात नकळत अनेक चुका
  • सर्व काही सांभाळूनही जडतात आजार
  • काही गोष्टी बदललल्या तर बदलेल चित्र

Healthy Lifestyle Mistakes : अनेकदा आरोग्याशी (Health) संबंधित सर्व बाबींचं योग्य प्रकारे पालन करुनही सतत आजारी (Illness) पडत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. वेळेत जेवण करणे, पोष्टिक आहार घेणे, योग्य वेळी झोपणे, भरपूर झोप घेणे यासारखं आरोग्यपूर्ण शेड्यूल सांभाळूनदेखील वारंवार कुठले ना कुठले आजार मागे लागत असल्याचं अनेकजण सांगतात. अनेकांना कामाच्या व्यापामुळे पुरेशी झोप घेता येत नाही,काहीजण भरपूर पाणी पित नाहीत तर काहींना इतर काही कारणांमुळे व्यायामाचा फायदा होत नसल्याचं दिसून येतं. आरोग्यपूर्ण आयुष्य जगताना काही गोष्टी जरी चुकीच्या (Small mistakes) केल्या तरी त्याचा फटका आपल्या आरोग्याला बसण्याची शक्यता असते. जाणून घेऊया, कुठल्या चुका सर्वसामान्य माणसांकडून नेहमीच केल्या जातात, ज्या टाळणं गरजेचं आहे याविषयी. 

झोपताना फोन डोक्यापाशी ठेवणे

अनेकजण रात्री ठराविक वेळेत झोपतात आणि पुरेशी झोप झाल्यावर सकाळी उठतात. तरीही त्यांची झोप पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. मोबाईल जवळ ठेवल्यामुळे बहुतांशजणांना असा अनुभव येतो. अनेकांना रात्री उशिरापर्यंत कित्येक तास मोबाईल पाहण्याची आणि नंतर तो उशाखाली घेऊन झोपण्याची सवय असते. मात्र यामुळे तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते. फोनमधील व्हायब्रेशनमुळे आपली झोप विचलित होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे फोनला स्पर्श झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणारी लाईटदेखील झोपेचा दर्जा कमी करते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Hair Care Tip: पांढरे केस नॅचरली काळे करण्यासाठी आहारात करा 'या' 10 खास पदार्थांचा समावेश

रात्री दात न घासणे

अनेकांना रात्री जेवल्यानंतर दात न घासताच झोपण्याची सवय असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणातील काही कण दातात अडकून बसतात आणि दात किडायला सुरुवात होते. त्यामुळे दात कमकुवत आणि ठिसूळ होऊ लागतात. त्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर साधारण 40 मिनिटांनी दात घासण्याचा आणि त्यानंतरच झोपण्याचा सल्ला दिला जातो. 

मेकअप न काढणे

अनेकांना दिवसा केलेला मेकअप न काढताच झोपण्याची सवय असते. अनेक महिला थकल्यामुळे मेकअप न काढताच झोपतात. त्यामुळे आपली त्वचा खराब होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर दिवसभर जमा झालेले बॅक्टेरिया,धूळ, माती यासारख्या गोष्टी रात्री फेसवॉश केल्याने धुऊन जातात. मेकअप काढण्यासाठी नारळाच्या तेलाचा किंवा क्लिनजिंग मिल्कचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. 

अधिक वाचा - Hardik Pandya fitness: सडपातळ असूनही हार्दिक पांड्या मारतो षटकार, जाणून घ्या पांड्याचा फिटनेस फंडा

नाश्ता न करणं

अनेकांना सकाळच्या नाश्ता स्किप करण्याची सवय असते. त्यामुळे अनेक उपाय करूनही वजन कमी होत नसल्याचा अनुभव येतो. सकाळचा नाश्ता केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. सकाळचा नाश्ता न करणाऱ्या व्यक्तींना मधुमेहाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात फळं, अंडे, ज्यूस, दूध यासारख्या पौष्टिक पदार्थांपासून करण्याचा सल्ला दिला जातो. 

डिस्क्लेमर - आरोग्य आणि लाईफस्टाईलबाबतच्या या सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी