Unhealthy food Items : पावसाळा (Monsoon) सुरु झाल्यावर आजूबाजूच्या वातावरणात एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं. त्यामुळे अनेक पदार्थ (Food items) खाण्याची इच्छा होते. विशेषतः पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर चहा आणि भजी (Tea and pakoda) खाण्याकडे अनेकांचा कल असतो. पाऊस सुरू असताना त्याचा आनंद घेत सोबतीला गरमागरम चहा आणि भजी खाण्याला अनेकजण पसंती देताना दिसतात. मात्र ही भजी आरोग्यासाठी हानीकारक (dangerous) ठरण्याची शक्यता असते. कारण भजी किंवा वडा हे पदार्थ तेलकट असतात. या तेलाचा त्वचेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि त्यामुळे त्वचेवर पिंपल्स उठण्याची समस्या सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसााळ्यात कितीही मूड आला तरी तेलकट (oily food) पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे इतरही अनेक असे पदार्थ आहेत, जे प्रत्यक्षात पौष्टिक मानले जातात. मात्र पावसाळ्यात या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊया अशाच काही पदार्थांविषयी.
पावसाळ्यात दूथ आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचं कमीत कमी सेवन करावं, असा सल्ला दिला जातो. दूध हे खरं तर पौष्टिक मानलं जातं. दुधात अनेक पोषक घटक असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. मात्र उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात ज्या प्रकारे दुधाचा शरीराला फायदा होतो, तसा फायदा पावसाळ्यात होत नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पावसाळ्यात दुधाचं सेवन थोडं कमी करण्याचा सल्ला दिला जातो. दुधामुळे हार्मोन्सवर परिणाम होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे दुधाचं नीट पचन झालं नाही, तर चेहऱ्यावर पिंपल्स आणि फुटकुळ्या उठायला सुरुवात होते.
अधिक वाचा - Hair Care Tips: पुरुषांनी केसगळती थांबवण्यासाठी करावे हे सोपे घरगुती उपाय...कधीही पडणार नाही टक्कल!
पावसाळ्यात भजी आणि वडे खाण्याचा छंद अनेकांना असतो. या छंदाला जर वेळीच आवर घातला नाही, तर खाल्लेल्या भजी आणि वडे चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होते. अर्थातच, चेहऱ्यावर फुटकुळ्या उठू लागतात आणि पिंपल्स येऊ लागतात. तळलेले पदार्थ अधिक खाण्यामुळे त्वचेचं नुकसान होत असल्याचं वारंवार दिसूनही आलं आहे. त्यात पावसाळ्यात असे पदार्थ खाण्यामुळे तर त्वचेचं आरोग्य लवकर बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात कमीत कमी तळलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे.
अधिक वाचा - Moong Dal : काहीजणांसाठी मूगडाळ खाणं ठरू शकतं धोकादायक? तुम्हीही त्यापैकीच आहात का? वाचा तपशील
पालक ही पालेभाजी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्याचे अनेक औषधी गुणही असतात. मात्र पावसाळ्यात पालक खाणं हे त्वचेसाठी योग्य नसल्याचं सांगितलं जातं. पालकामध्ये आयोडिनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पावसाळ्यात त्याचे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या त्वचेचं सौंदर्य बिघडू शकतं आणि चेहऱ्यावर फुटकुळ्या येऊ शकतात.
डिस्क्लेमर - या सर्व सामान्य आणि घरगुती स्वरुपाच्या टिप्स आहेत. त्वचेसंबंधी तुम्हाला जर काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.