High Cholesterol Food : या गोष्टी खाल्ल्या की कोलेस्ट्रॉल वाढणार म्हणजे वाढणारच! आत्तापासूनच द्या सोडून

कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ कारणीभूत असतात. जाणून घेऊया अशाच काही पदार्थांविषयी

High Cholesterol Food
या गोष्टींनी हमखास वाढणार कोलेस्ट्रॉल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काही पदार्थ रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात
  • अशा पदार्थांपासून राहा दूर
  • वेळीच घ्या आरोग्याची काळजी

High Cholesterol Food : कोलेस्ट्रॉल (Cholesterol) हा घटक एका मर्यादेपेक्षा अधिक वाढणं ही शरीरासाठी धोक्याची घंटा (Dangerous) असते. एका पातळीपर्यंत कोलेस्ट्रॉल ही शरीराची गरज असते. मात्र जर हे कोलेस्ट्रॉल अधिक वाढलं तर मात्र रक्तप्रवाहात (Blood Supply) अनेक अडथळे निर्माण होऊन गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं. त्यामुळेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. कोलेस्ट्रॉलमध्ये चांगलं (HDIL) आणि वाईट (LDIL) असे दोन प्रकार असतात. चांगल्या कोलेस्ट्रॉलची शरीराला गरज असते, तर वाईट कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊन गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. काही पदार्थ हे हमखास कोलेस्ट्रॉल वाढवणारे असतात. असे पदार्थ ओळखून त्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जाणून घेऊया रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवणारे काही पदार्थ.

१. चॉकलेट आणि चॉकलेट स्प्रेड 

चॉकलेटमध्ये साखर आणि सॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. दूध आणि व्हाईट चॉकलेटमध्येही सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे चॉकलेट स्प्रेड खरेदी करताना त्याच्या लेबलवर लिहिलेल्या गोष्टी नीट वाचणे आणि त्यातील कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या घटकांचे प्रमाण नीट तपासणे गरजेचे आहे. 

२. चीज 

चीजनमध्येही सॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. विशेषतः फुल फॅट दूधापासून तयार होणाऱ्या चीजमध्ये या फॅट्स अधिक आढळतात. प्रमाणात खाल्लेलं चीज आरोग्यासाठी चांगलं असतं, मात्र प्रमाणापेक्षा अधिक चीज खाणं महागात पडू शकतं.

अधिक वाचा - Cause of Heart Attack : अंघोळ करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, या गोष्टी ठेवा लक्षात

३. नारळाचं तेल

नारळाच्या तेलात 90 टक्के सॅच्युरेटेड फॅट्स असतात. नारळाचं तेल हे लोण्यापेक्षाही अधिक घातक मानलं जातं. नारळाच्या तेलाचं सेवन केल्यामुळे HDL आणि LDL दोन्हीची पातळी वाढायला सुरुवात होते. सातत्याने नारळाच्या तेलाचा वापर केला तर हृदयरोगाची शक्यता वाढते, असं तज्ज्ञ सांगतात.

४. मटण

मटण खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वेगाने वाढते. प्राण्यांच्या शरीरातील फॅट्स आपल्या शरीरात गेल्यामुळे हे घटत असल्याचं सांगितलं जातं. विशेषतः गायीच्या आणि बैलांच्या मांसात सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण अधिक असतं. 

अधिक वाचा - Health Tips : जेवल्यानंतर थंड पाणी पिणाऱ्यांनी व्हा सावध, देत आहात आजारांना निमंत्रण

५. तळलेलं फास्ट फूड

फ्रेंच फ्राईज किंवा फ्राईड चिकन यासारख्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्याचप्रमाणे त्यात प्रचंड कॅलरीज असून मिठाचं प्रमाणही जास्त असतं. तळलेले फास्ट फूड खाण्यावर नियंत्रण ठेवलं नाही, तर रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊन वाईट कोलेस्ट्रॉल वाढायला सुरुवात होते. शरीरात चांगलं कोलेस्ट्रॉल टिकवून ठेवण्यासाठी फास्ट फूडचं कमीत कमी सेवन करणं गरजेचं आहे. 

६. बटर आणि चरबी

लोणी आणि प्राण्यांची चरबी यात प्रचंड कोलेस्ट्रॉल तयार करण्याची क्षमता असते. या पदार्थांमध्ये असणाऱ्या सॅच्युरेडेट फॅट्समुळे शरीरातील LDL या प्रकारच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढीस लागते. त्यामुळे जेवणात शक्यतो ऑलिव ऑईलचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. 

७. क्रीम

फुल फॅट दुधापासून तयार झालेल्या क्रीममध्येही सॅच्युरेटेड फॅट्स असतात. बाजारात मिळणारी क्रीम तर आरोग्यासाठी अधिकच हानीकारक ठरण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा -Health Tips: तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या

८. पॅकेज्ड फूड

पॅक केलेले स्नॅक्स, मिठाई, चिप्स, डोनट्स,केक, बिस्किटं, कुकीज यासारखे पदार्थ वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासाठी मदत करतात. 

डिस्क्लेमर - कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या या सर्व सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला कोलेस्ट्रॉलसंबंधी काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी