Skin damaging food: हे चार पदार्थ त्वचेसाठी ठरतात ‘विष’, आजपासून करा बंद

काही पदार्थ हे त्वचेसाठी इतके हानीकारक असतात की ते तातडीने बंद कऱण्याचा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांकडून दिला जातो. जाणून घेऊया, कुठले आहेत असे पदार्थ.

Skin damaging food
हे चार पदार्थ ठरतात त्वचेसाठी ‘विष’  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काही पदार्थांमुळे बिघडते त्वचेचे आरोग्य
  • कमी वयात दिसू लागतं अधिक वय
  • तळलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स करू शकतात नुकसान

Skin damaging food: आपण जसे खातो, तसे दिसतो असं म्हटलं जातं. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी (Eating habits), आपली लाईफस्टाईल (Lifestyle), झोपण्याच्या वेळा यासारख्या अनेक घटकांवर आपल्या त्वचेचं आरोग्य अवलंबून असतं. गेल्या काही दिवसांत अनेकजण कमी वयातच म्हातारे दिसू लागल्याचा अनुभव येतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कामाच्या उलटसुलट वेळेचा सर्वाधिक परिणाम हा त्वचेवर (Skin) होत असतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक विकार जडायला सुरुवात होते आणि कमी वयात त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. या सुरकुत्या टाळण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र आपल्या रोजच्या खाण्यातून काही पदार्थ वजा केले, तर सुरकुत्या पडण्याचं हे प्रमाण लगोलग कमी होऊन जातं. काही पदार्थ हे त्वचेसाठी इतके हानीकारक असतात की ते तातडीने बंद कऱण्याचा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांकडून दिला जातो. जाणून घेऊया, कुठले आहेत असे पदार्थ. 

तळलेले पदार्थ

अनेकदा आपल्याला तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा अनिवार होते. काहीवेळा तर केवळ मूड आला म्हणून तळलेले पदार्थ खाल्ले जातात. अर्थात, अधूनमधून असे पदार्थ खाण्याने फारसा फरक पडत नाही. मात्र काहीजणांना रोजच्या जेवणात तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. ही सवय तुमच्या आरोग्यासाठी तर घातक ठरतेच, शिवाय तुमच्या त्वचेवर त्याचे लवकरच परिणाम दिसायला सुरुवात होते. त्यामुळे दीर्घकाळ तरुण दिसायचं असेल, तर तळलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याची गरज आहे. 

साखर

साखर किंवा व्हाईट शुगरचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. हेल्थ एक्सपर्ट्स कमीत कमी साखर खाण्याचा सल्ला देतात. साखरेचं प्रमाण आहारात अधिक असेल तर हळूहळू त्वचेची चमक निघून जायला सुरुवात होते. तळलेल्या पदार्थांप्रमाणेच साखरमुळेदेखील कोलेजनच्या निर्मितीत वाढ होते. त्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागातील त्वचेवर सुरकुत्या पडणे, रेषा उठणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. 

अधिक वाचा - Side effects of coconut water: नारळ पाण्याचाही काहीजणांना होऊ शकतो त्रास, ही असतात कारणं

बटर/ मार्जरिन

घराबाहेर अनेकदा पदार्थ चमचमीत कऱण्यासाठी बटरचा वापर करण्यात येतो. मात्र हे बटर त्वचेसाठी हानीकारक असल्याचं वेळोवेळी केलेल्या संशोधनातून दिसून आलं आहे. एका अभ्यासानुसार, जे लोक मार्जरिन किंवा बटरचं अतिसेवन करतात, त्यांच्यात रिंकल्स, फाईन लाइन्स आणि त्वचा डॅमेज होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं दिसतं. मार्जरिन हा पदार्थ ट्रान्स फॅट्स आणि व्हेजिटेबल ऑईलपासून तयार करण्यात येतो. त्यामुळे याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत असल्याचं दिसतं. 

अधिक वाचा - Cashews: काजू खाल्ल्याने होतील जबरदस्त फायदे, पण...

डेअरी उत्पादने

डेअरी उत्पादनांचा त्वचेवर नेमका काय परिणाम होतो, याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद असल्याचं दिसतं. काहींच्या मते त्यापासून त्वचेला काहीही नुकसान होत नाही, तर काहीजणांच्या मते डेअरी प्रॉडक्ट्समुळे त्वचेचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. मात्र डेअरी प्रॉडक्ट्समध्ये असणाऱ्या घटकामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येण्याची शक्यता असते. परिणामी वय वाढल्याचा भास शारीरिक स्थितीकडे पाहून होण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर - त्वचेच्या आरोग्याशी संबंधित या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी