Food For Men: पुरुषांनी मजबूत आणि तंदुरुस्त राहण्यासाठी खावेत हे पदार्थ...

Health Tips : अलीकडच्या काळात अनेक पुरुषांना फिटनेसचा प्रश्न भेडसावतो आहे. व्यस्त जीवनशैली, आहारातील बदल, टेन्शन, करियची धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. निरोगी राहण्यासाठी काय खावे याबद्दल जाणून घ्या.

Men Health
पुरुषांचे आरोग्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुरुषांच्या डोक्यावर अनेक जबाबदाऱ्या, शिक्षण आणि करिअरच्या चिंता असतात.
  • धकाधकीची जीवनशैली, कामाचा व्याप यामुळे पुरुष स्वत:ची काळजी घेऊ शकत नाहीत
  • लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे

Best Food For Men Health :नवी दिल्ली : जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्य (Health), तंदुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक पुरुषांना फिटनेसचा (Men Fitness) प्रश्न भेडसावतो आहे. सध्याच्या युगात पुरुषांच्या डोक्यावर अनेक जबाबदाऱ्या, शिक्षण आणि करिअरच्या चिंता असतात. या सर्व बाबींना तोंड देणे सोपे नसते. त्यातच धकाधकीची जीवनशैली, कामाचा व्याप यामुळे ते स्वत:ची काळजी घेऊ शकत नाहीत आणि खाण्यापिण्यात अत्यंत निष्काळजी असतात. त्यामुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आहाराच्या सवयींमध्ये (Food Habits) बदल करावे लागतील, तरच तुम्ही निरोगी आणि सशक्त बनू शकता.  तंदुरुस्तीसाठी पुरुषांनी खाणे कोणते पदार्थ आवश्यक आहे ते पाहूया. (These foods are useful for men to have good health)

अधिक वाचा : IND vs AUS: एका वर्षात टीम इंडियाला डबल झटका, पहिल्या टी-२०मध्ये झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

पुरुषांचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे अन्नपदार्थ-

1. दूध
पुरुषांनी लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत दूध आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करणे आवश्यक आहे कारण त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने, अमिनो अॅसिड आणि ल्युटीन भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पुरुषांचे शरीर मजबूत होते.

2. अंडी
रोज अंडी खा असं म्हटलं जातं. कारण ते एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नसतात. नाश्त्यात खाण्याची शिफारस अनेकदा केली जाते. अंड्यामध्ये प्रोटीन, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि ल्युटीन असते, जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

अधिक वाचा : Bhuvneshwar Kumar च्या बचावासाठी बायकोने खोचला पदर, रिकामटेकड्यांना सुनावले खडे बोल

3. बियाणे
आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक बिया आहेत ज्यांचा पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो. या बियांमध्ये प्रथिने, फायबर आणि नैसर्गिक चरबी असते ज्यामुळे प्रोस्टेट आणि कोलन कर्करोगाचा धोका कमी होतो.

4. हिरव्या भाज्या
आरोग्य तज्ञ नेहमी दैनंदिन आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस करतात, कारण त्या पुरुषांसह प्रत्येकासाठी फायदेशीर असतात. या यादीत तुम्ही पालक, ब्रोकोली आणि कोबी यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

अधिक वाचा :Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरचा किचनमध्येही जलवा, ऑम्लेट पाहून ब्रेट ली म्हणाला, खायला येतोय

5. सुकी फळे
सुका मेवा नेहमीच आरोग्यासाठी चांगला मानला जातो. कारण त्याचा शरीरालाच नव्हे तर मनालाही फायदा होतो. बदाम आणि अक्रोड खाल्ल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

याचबरोबर इतरही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. किमान 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. लवकर उठण्यासाठी झोपेशी तडजोड करावी लागेल, असे करता कामा नये. नियमित व्यायाम केला पाहिजे. फास्ट फूड टाळले पाहिजे. जीवनशैलीत सकारात्मक बदल केले पाहिजे. तणावाचे व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी