Weight Gain: या फळांच्या सेवनाने वाढेल तुमचे वजन

तब्येत पाणी
Updated May 25, 2022 | 13:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते. सोबतच ज्यांना मसल्स गेन करायचे आहेत ते केळे खाणे पसंत करतात.

fruits
Weight Gain: या फळांच्या सेवनाने वाढेल तुमचे वजन 
थोडं पण कामाचं
  • पीचमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात.
  • अंजीरच्या सेवनाने तुमचे वजन वाढू शकते.
  • केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते. सोबतच ज्यांना मसल्स गेन करायचे आहेत ते केळे खाणे पसंत करतात.

मुंबई: आपल्यापैकी एनेक लोकांचे म्हणणे असते की वजन कमी करण्यासाठी(weight loss) फळांचे सेवन केले पाहिजे. हे काही प्रमाणात योग्य आहे मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही फळे(fruits) अशीही आहेत ज्यांच्या सेवनाने तुमचे वजन वाढू शकते. होय, काही हाय कॅलरीज फळांच्या(high calories fruits) सेवनाने तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता. जाणून घेऊया या फळांबाबत...these fruits are help to weight gain

अधिक वाचा - या तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात मिळते मोठे पद

पीच - पीचमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. जर तुम्ही या फळाचे सेवन अधिक प्रमाणात करता तर यामुळे तुमच्या शरीराचे वजन वाढू शकते. 

अंजीर - अंजीरच्या सेवनाने तुमचे वजन वाढू शकते. खासकरून सुके अंजीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. याचे सेवन केल्याने शरीराचे वजन वाढण्यास मदत होते.

सिताफळ - हे फळ खाण्यास अतिशय गोड असते. सोबतच यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे या फळाच्या सेवनाने तुमचे वजन वाढू शकते. अशातच जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हे फळ खाऊ नका. 

केळी - केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते. सोबतच ज्यांना मसल्स गेन करायचे आहेत ते केळे खाणे पसंत करतात. मात्र जर तुम्ही वजन घटवण्यासाठी केळे खात असाल तर मर्यादित प्रमाणात खा. अधिक प्रमाणात केळी खाल्ल्याने शरीराचे वजन घटण्याऐवजी वाढू शकते. 

अधिक वाचा - 800 वर्ष जुन्या इतिहासावर कोर्टात चर्चा, जाणून घ्या प्रकरण

चिकू - चिकू हे फळ सीताफळप्रमाणेच गोड असते. यात शुगर आणि कॅलरीजचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. 

आंबा - आंब्याचे सेवन अधिक केल्याने शरीराचे वजन वाढू शकते. त्यामुळे वजन वाढवणाऱ्यांनी जरूर आंबा खावा मात्र ज्यांना वजन घटवायचे आहे त्यांनी आंब्याचे सेवन कमी करावे. 

वजन कमी करणारी फळे

सफरचंद - सफरचंद खाल्ल्याने तब्येत चांगली राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. कारण सफरचंदमध्ये कॅलरी कमी असतात. सफरचंदात ११० कॅलरी असतात आणि यात भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात. सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल फार वाढत नाही. 

बेरीज - बेरीमुळे वजन कमी होण्यास मदत कमी होते कारण एका बेरीमध्ये केवळ ४२ कॅलरी असतात. तसेच बेरी खाल्ल्याने विटामिन सी आणि मॅगनीजही मिळतं. 

किवी - चिकू सारख्या दिसणारे हे फळ खुप पौष्टिक असतं. ह फळ खाल्ल्याने नक्कीच वजन कमी होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी