BP Control Tips:सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे (lifestyle) अनेकजणांना उच्च रक्तदाबाच्या (blood pressure)समस्या येत आहेत. साधरण जर रक्तदाब रीडिंग 100/140 mmHgच्या सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या आहे हे समजून घ्या. वय, लिंग, कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैली यासारख्या अनेक कारणांमुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत असते. उच्च रक्तदाबाची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी तुमच्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पोटॅशियम(potassium),मॅग्नेशियम (magnesium)समृद्ध अन्न तुमचे रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते. (These fruits control blood pressure, include them in your diet today)
अधिक वाचा : लघवीला गेला अन् कळालं प्रायव्हेट पार्टच झालाय गायब..
रक्तदाबाच्या समस्येने पीडित लोकांसाठी काही तज्ज्ञ डॅश डायट देण्याचा सल्ला देत असतात. म्हणजेच डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेंशन आहार. या आहारात कमी मीठ असलेले अन्न सेवन करतात, जसे की मासे, डाळ, नट्स, फ्रू्टस, डाळ आदीचा समावेश होत असतो.
केळी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते. पोटॅशियमचा वापर शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित करण्यासाठी केला जातो. हे रक्तवाहिन्यांना आराम देते, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
अधिक वाचा : CRPF मध्ये 1458 हेड कॉन्स्टेबल आणि ASIभरती
उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी अमीनो आम्ल फायदेशीर आहे. टरबूजमध्ये सिट्रुलीन नावाचे अमिनो अॅसिड आढळते. हे रक्तवाहिन्यांना देखील आराम देते, ज्यामुळे रक्तदाब कमी होत असतो. म्हणजेच रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवत रक्तदाबाशी संबंधित आजार दूर ठेवण्यात फायदेशीर आहे.
रक्तदाबाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही डाळिंब खूप गुणकारी आहे. या फळामध्ये अँजिओ टेंशन कन्व्हर्टिंग एन्झाइम आढळते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो आणि रक्तदाब संतुलित राहत असते.
उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास सफरचंद खाणे खूप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये पॉलिफिनॉल्स आणि पोटेशिअम आढळत असते, जे ब्लडप्रेशर नियंत्रित करत असते. तसेच पोटासंबंधी असलेल्या इतर समस्या देखील दूर होत असतात. याशिवाय ब्ल्यूबेरी आणि स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.