Male Fertility: विवाहित पुरूषांनी ताबडतोब बदला या सवयी; नाहीतर बाप होण्याचे स्वप्न होईल भंग 

तब्येत पाणी
Updated May 21, 2022 | 16:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Married Men Health Tips । विवाहित पुरुषांना अनेकदा शारीरिक कमकुवतपणाचा सामना करावा लागतो, ज्याबद्दल ते खूप अस्वस्थ असतात. परंतु लाजेमुळे ते डॉक्टर किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीला सांगू शकत नाहीत.

These habits should be changed immediately by married men
विवाहित पुरूषांनी ताबडतोब बदला या सवयी, नाहीतर...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विवाहित पुरुषांना अनेकदा शारीरिक कमकुवतपणाचा सामना करावा लागतो.
  • लाजेमुळे ते डॉक्टर किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीला सांगू शकत नाहीत.
  • लठ्ठपणामुळे डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Married Men Health Tips । मुंबई : विवाहित पुरुषांना अनेकदा शारीरिक कमकुवतपणाचा सामना करावा लागतो, ज्याबद्दल ते खूप अस्वस्थ असतात. परंतु लाजेमुळे ते डॉक्टर किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीला सांगू शकत नाहीत. प्रामुख्याने अनहेल्दी जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी किंवा इतर निष्काळजीपणा हे कारण असू शकते, परंतु काही सवयींमध्ये बदल करून पुरुषांची प्रजनन क्षमता वाढू शकते. (These habits should be changed immediately by married men). 

अधिक वाचा : पीव्ही सिंधूचा थायलंड ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभव

पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अशा जीवनशैलीचे पालन करा

१) लठ्ठपणापासून दूर राहा - लठ्ठपणामुळे डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, परंतु वजन वाढल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा परिणाम होतो, असे अनेक आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. अशा स्थितीत शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि तेलकट पदार्थ कमीत कमी खाणे आवश्यक आहे.

२) डॉक्टरांचा सल्ला घेत राहा - शरीराच्या ताकदीवर आणि प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तज्ञ डॉक्टरांचा वारंवार सल्ला घेत राहा. तसेच तपासण्या करून घ्या. तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवून तुम्ही प्रजननाच्या संबंधित समस्या टाळू शकता.

३) लैंगिक संक्रमणापासून वाचा - चांगल्या वैवाहिक जीवनासाठी, असुरक्षित शारीरिक संबंधांपासून स्वतःला दूर ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा लैंगिक संक्रमित रोग (STD) तुमच्या शरीरातही पसरू शकतात. यामुळे संपूर्ण शरीर कमजोर होईल आणि बाप बनण्याचे स्वप्न स्वप्नच राहील. 

४) स्वच्छतेची विशेष काळजी घ्या - मानवी जीवनात स्वच्छतेला अत्यंत महत्त्व आहे, कारण निरोगी आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमचा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवला नाही तर तिथे बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. घाणीपासून संसर्ग होण्याचा धोका असतो, ज्यामुळे प्रजननक्षमतेलाही हानी पोहोचते.

५) दारू आणि सिगारेटपासून दूर राहा - सिगारेट ओढल्याने फुफ्फुसांचे नुकसान होते, तर दारूच्या अतिसेवनाने यकृतावर वाईट परिणाम होतो. परंतु या व्यसनाला बळी पडलेल्या पुरुषांच्या स्वतःच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचते याची माहिती असणे गरजेचे आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी