Healthy Diet : खाण्यापिण्याच्या योग्य सवयी ठेवतील चिरतरूण, आजपासून या गोष्टी सुरू करा

आपण चिरतरूण दिसावं आणि म्हातारपणीही फिट राहावं असं अनेकांना वाटत असतं. हे शक्यही आहे. मात्र त्यासाठी आतापासूनच काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

Healthy Diet
खाण्यापिण्याच्या योग्य सवयी ठेवतील चिरतरूण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तेलकट पदार्थ खाण्यामुळे त्वचेवर पडतात सुरकुत्या
  • फळे आणि सॅलडमुळे त्वचा होईल तुकतुकीत
  • चिरतारुण्यासाठी आहार आणि व्यायाम सांभाळणे आवश्यक

Healthy Diet : आपण दीर्घकाळ तरुण (Young forever) राहावं आणि फिट (Fit) दिसावं, असं प्रत्येकाला वाटतं. उतारवयाला सुरुवात झाली तरी आपण अजूनही तरुण आहोत, असं इतरांना आणि स्वतःला वाटावं यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्नही करत असतं. काहीजण जिमला जाऊन जोरदार व्यायाम करतात, काहीजण योगा करायला सुरुवात करतात, तर काहीजण दररोज धावण्याचा व्यायाम करू लागतात. मात्र या सगळ्याइतकाच महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आपलं खाणंपिणं आणि चांगल्या सवयी. ज्या व्यक्तींना खाण्यापिण्याच्या (Eating Habits) आणि व्यायामाच्या (Exercise) चांगल्या सवयी असतात, त्या व्यक्ती दीर्घकाळ तरुण राहतात आणि म्हातारपण त्यांच्याकडे फिरकतही नाही. मात्र ज्या व्यक्तींना फास्टफूडचा नाद लागतो, वेगवेगळी व्यसनं जडतात, त्या व्यक्ती चाळीशीतच म्हाताऱ्या दिसू लागतात. दीर्घकाळ आपलं तारुण्य आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात.जाणून घेऊया असेच काही साधेसोपे घरगुती उपाय. 

मसालेदार पदार्थ टाळा

अनेकांना मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र त्यामुळे तुमच्या त्वचेचं वय वाढू लागतं. अधिक तेलकट खाण्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. सुरकुत्या हे म्हातारपणाचं पहिलं लक्षण मानलं जातं. त्यामुळे चिरतरूण राहण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळणं आवश्यक आहे. 

फळ आणि सॅलड वाढवा

आहारात फळं आणि सॅलड यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढायला मदत होते आणि त्वचेची चमक आणि आरोग्य टिकून राहतं. त्यामुळे तुम्ही सतत तरुण दिसत राहता. 

अधिक वाचा - Gym After Surgery : हार्ट सर्जरीनंतर जिमला जाणं धोकादायक! चुकूनही घालू नका जीव धोक्यात

जेवणानंतर घ्या वॉक

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी जेवणानंतर चालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत होते आणि शरीरात फॅट्स जमा होत नाहीत. त्याचप्रमाणं चालताना शरीरातून घाम बाहेर पडत असल्यामुळे त्वचेची छिद्रं खुली होतात आणि शरीरातील विषारी घटकही बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा तरुण आणि तुकतुकीत दिसू लागते. 

अधिक वाचा - Heart Attack Factors: या 4 गोष्टी आहेत हृदयाच्या शत्रू, न टाळल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

रात्री हलका आहार घ्या

दिवसभर काम केल्यानंतर अनेकांना रात्री प्रचंड भूक लागते. त्यामुळे साहजिकच रात्रीचं जेवण जास्त केलं जातं. दिवसभर अनेकांना कामाच्या व्यापात खाण्यासाठी वेळ नसतो. अनेकांना वेळ असला तरी काम संपल्याशिवाय जेवण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे दिवसभराचं काम संपवून रात्रीचं भरपेट जेवण करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र ही बाब आरोग्यासाठी चांगली नसल्याचं दिसून आलं आहे. रात्री अतिरिक्त जेवल्यामुळे शरीरात फॅट्स साठतात आणि पचनक्रियाही मंदावते. त्यामुळे रात्रीचा आहार अत्यंत हलका असणं आवश्यक आहे. 

डिस्क्लेमर : या सर्व आरोग्याबाबतच्या सामान्य आणि घरगुती स्वरुपाच्या टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी