Heel Pain : टाचदुखीने त्रस्त झाला आहात का? मग हे घरगुती उपाय देतील झटक्यात आराम

Heel pain remedy : टाचदुखी ही एक चिवट समस्या असते. अलीकडच्या काळात अनेकजणांना टाचदुखीचा त्रास असतो. खासकरून ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसते. यासाठी अनेक कारणे आहेत. हिवाळ्यात या प्रकारच्या दुखण्याचा जास्त त्रास होतो. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येवर मात करू शकता.

Heel Pain
टाचदुखी 
थोडं पण कामाचं
  • टाचदुखीचा त्रास अनेकांना होतो
  • टाचदुखीसाठी अनेक कारणे असतात
  • काही घरगुती उपायांनी टाचदुखी होईल दूर

Home Remedies For Heel Pain:नवी दिल्ली : आपल्या शरीराचा सर्व भार आपल्या पायांवर असतो. त्यातही आपल्या टाचा खूपच महत्त्वाच्या असतात. टाचदुखी (Heel Pain) ही एक चिवट समस्या असते. अलीकडच्या काळात अनेकजणांना टाचदुखीचा त्रास असतो. खासकरून ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसते. यासाठी अनेक कारणे आहेत. वजन वाढणे, सतत उभे राहणे, नवीन प्रकारचा व्यायाम करणे यासारख्या गोष्टींचाही परिणाम होत असतो. त्याचबरोबर कॅल्शियमची कमतरता, वाढत्या वयाबरोबर होणारी शरीराची झीज हीदेखील कारणे असतात. हिवाळ्यात या प्रकारच्या दुखण्याचा जास्त त्रास होतो. काही घरगुती उपाय (Home remedies for heel pain) करून तुम्ही या समस्येवर मात करू शकता. (These home remedies will give relief in heel pain)

अधिक वाचा : जेवणानंतर गुळ खावा की नाही?

टाचांसाठीचे व्यायाम

टाचदुखीपासून मुक्त होण्यासाठी काही व्यायाम प्रकार फारच उपयुक्त असतात. यासाठी सर्वात आधी आपल्या पंजाच्या आधारे आपल्या शरीराचा सर्व भार ठेवा. त्यानंतर आपली टाच वर उचला आणि शरीरावर ताण द्या. हा व्यायाम सकाळी उठल्यावर करणे फायदेशीर ठरते.

फुट रेज आणि उष्ट्रासन

फुट रेजचा व्यायाम देखील तुम्हाला टाचदुखीसाठी खूपच उपयुक्त ठरतो. हा व्यायाम करण्यासाठी टाच जमिनीवर ठेवा आणि पायाची बोटे किंवा पायाचा पंजा वरच्या बाजूस ताणा. हा व्यायाम पुन्हा एकदा करा. असे केल्याने तुम्हाला लवकरच टाचदुखीपासून आराम मिळेल.

अधिक वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

घरगुती उपाय 

टाचदुखीच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी तुम्ही आल्याचा काढा पिऊ शकता. टाचेला सूज आल्यावरदेखील आल्याचा काढा उपयुक्त असतो. लवंगाच्या तेलामध्येदेखील टाचेच्या वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. या तेलाने मालिश केल्याने टाचदुखीतून आराम मिळतो. तुम्हाला हवे असल्यासएक बादली गरम पाण्यात टाका आणि त्यात पाय टाकून बसा. यामुळे तुमच्या टाचेला आराम मिळेल. 

अधिक वाचा : Shocking ! एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या की सामूहिक आत्महत्या?

जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्याच्या अनेक तक्रारी मागील काही वर्षात अचानक वाढल्या आहेत. टाचदुखीसारखी समस्या ही त्यातीलच एक आहे. चुकीच्या आहारपद्धतीमुळे अनेकांचे वजन वाढत जाते. परिणामी हाडांवर भार वाढतो. त्यातही तो टाचेवर सर्वात जास्त वाढतो. शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. पोषण देणारे पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्यामुळे कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांची शरीरात कमतरता तयार होते. वर सुचवलेल्या उपायांबरोबरच नियमित व्यायाम केल्यास आणि आहार विहारात सुधारणा केल्यास त्याचा टाचदुखीवर चांगला फायदा होईल. अशा समस्या जितक्या लवकर आटोक्यात आणल्या तितक्या त्या योग्य ठरतात. वय वाढत गेल्यानंतर यावर मात करण्यास जास्त कालावधी लागतो.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी