Moong Dal : आहारात (Diet) सर्व प्रकारच्या डाळी (Dal) खाव्यात, असं सांगितलं जातं. प्रत्येक डाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वं असतात. त्यांचा आपल्या शरीराला फायदाच होत असल्याचं सांगितलं जातं. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या दाव्यानुसार प्रत्येक व्यक्तीला मूगडाळ (Moong Dal) खाणं मानवेलच असं नाही. अनेकांना मूगडाळ खाल्ल्यामुळे त्रास होत असल्याचं दिसून आलं आहे. काही विशिष्ट परिस्थितीत मूगडाळ खाणं हे आरोग्यासाठी चांगलं (Benefits) मानलं गेलं असलं तरी अनेकांना त्याचा फटकाही बसल्याचं दिसून आलं आहे. मूगडाळीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. ही डाळ शिजवून किंवा वाटून खाल्ली जाते आणि त्यापासून फायदाही होतो. मात्र नेमकी कुणाला ही डाळ न खाण्याचा सल्ला दिला जातो, हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हीदेखील त्यापैकी एक आहात का, याचा विचार करा आणि तुमच्या आहारात त्यानुसार आवश्यक बदल करू शकता. काही विशिष्ट शारीरिक आजार आणि विकार असणाऱ्या व्यक्तींना मूगडाळ खाण्यापासून दूर (Avoid moong dal) राहण्याचा सल्ला दिला जातो.
ज्या व्यक्तींच्या शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं असेल त्यांनी मूगडाळीपासून चार हात लांबच राहावं, असं सांगितलं जातं. मूगडाळीतील अनेक घटकांमुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असते. मूगडाळीतून पोषक घटक शरीराला मिळत असले, तरी त्यातून युरिक ॲसिडचीही निर्मिती करणारे घटक शरीरात जातात. त्यामुळे ज्यांना युरिक ॲसिड वाढीचा त्रास आहे त्यांनी किमान ही पातळी नियंत्रणात येईपर्यंत तरी मूगडाळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
अधिक वाचा - Daily Bath : रोज रोज अंघोळ करण्याची खरंच गरज आहे का? वाचा तज्ज्ञांचं मत
अधिक वाचा - Weight Loss Tips : अधूनमधून उपवास करताना या चुका कराल तर वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची असते शक्यता
कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनाही मूगडाळ खाऊ नका, असं डॉक्टर सांगतात. तर ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, त्यांना अधिकाधिक मूगडाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मूगडाळीच्या सेवनाने रक्तदाब कमी होण्यास मदत होत असते. त्यामुळे अगोदरच ज्यांचा रक्तदाब कमी आहे, त्यांना मात्र याचा फटका बसू शकतो.
अधिक वाचा - White Hair On Face: चेहऱ्यावर अचानक पांढरे केस येत असतील घाबरून न जाता 'हे' उपाय करा
ज्यांच्या रक्तातीत साखरेची पातळी कमी आहे, त्यांनाही मूगडाळ खाणं टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. मूगडाळ खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिकच खालावते आणि त्याचा आरोग्याला फटका बसू शकतो. ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, त्यांना मूगडाळ खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
डिस्क्लेमर - या सर्व मूगडाळ खाण्याबाबतच्या घरगुती टिप्स आहेत. तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.