Hair fall Reason: झपाट्यानं गळत असतील केस, तर ‘या’ आजारांचा असू शकतो धोका

तब्येत पाणी
Updated Feb 07, 2020 | 15:53 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Reasons for hair fall: केस गळणं ही एक सामान्य समस्या आहे, मात्र जेव्हा ही समस्या अधिक वाढते तेव्हा काळजी घेणं आवश्यक आहे. केसांचं सतत गळणं अनेक आजारांचे प्राथमिक संकेत असू शकतात.

Reasons for hair fall
झपाट्यानं गळत असतील केस, तर ‘या’ आजारांचा असू शकतो धोका 

थोडं पण कामाचं

  • हाय ब्लड प्रेशरमध्ये केस गळती वाढते
  • थॉयराईड वाढलं असेल किंवा कमी झालं असेल तरीही केस गळती होते.
  • कँसर झालेल्या रुग्णांना केस गळतीचा त्रास होतो.

Hair fall: केस गळती ही एक सामान्य समस्या बनलीय. अनेकदा लोकं या समस्येकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा ही समस्या वाढते तेव्हा डॉक्टरांकडे धावतात. केस गळतीची समस्या लोकांना गंभीर वाटते, पण त्याचं गांभीर्य लोकांना समजत नाही. खरंतर केस गळतीचे अनेक कारणं असतात. अनेक गंभीर समस्यांमध्ये केस गळत असतात. अशातच जर आपलीही केस गळती वाढली असेल तर आपण या आजारांची टेस्ट अवश्य करून घेतली पाहिजे. तर मग जाणून घ्या कोणकोणत्या आजारांमध्ये केसगळती होते.

ताण-तणाव सर्वात मोठी समस्या

ताण-तणाव असेल तर त्याचा परिणाम फक्त आपल्या हृदय आणि मेंदूवरच नाही तर आपल्या केसांवर सुद्धा होतो. ज्या लोकांमध्ये तणावाचं प्रमाण अधिक असतं किंवा ज्यांना डिप्रेशन येतं, अशा लोकांचे केस झपाट्यानं गळतात. यामागचं कारण हेच आहे की, तणाव असल्यास चांगले हार्मोन्स तयार होऊ शकत नाही आणि पचनक्रियेवर त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही आणि केस गळायला लागतात.

थायरॉईड असंतुलित होणं

थायरॉईडच्या असंतुलनामुळे केस झपाट्यानं गळतात. हायपर थायरॉईड किंवा हायपोथायरॉईडची समस्या असेल तर त्याचा त्वचा आणि केसांवर सर्वाधिक परिणाम होतो. जर केस गळती सोबतच झपाट्यानं वजन सुद्धा कमी होत असेल किंवा वाढत असेल तर आपल्याला थायरॉईड टेस्ट करणं आवश्यक आहे.

ब्लडप्रेशर वाढणं सुद्धा एक महत्त्वाचं कारण ठरतं

जर आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नेहमी वाढलेलं राहत असेल तरीही केस गळतीची समस्या होते. तसंच ब्लडप्रेशन वाढल्यानं रक्तातील सोडियमचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे ब्लड सर्कुलेशन डिस्टर्ब होतं आणि केसांवर याचा परिणाम होतो. यामुळे सुद्धा केस गळतीची समस्या उद्भवते.

कँसरमध्ये पण गळतात केस

कँसर एक खूप गंभीर आजार आहे. कँसर कुठलाही असो मात्र यात केसांवर त्याचा खूप परिणाम होतो. जर आपल्याला केस गळतीचं कारण समजत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

या संभाव्य आजारांमध्ये केस मोठ्या प्रमाणात गळतात, म्हणून केस गळतीकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे.

डिस्क्लेमर: वरील लेखामध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी