Diabetes Control: हिवाळ्यात वाढू शकते रक्तातील साखर...नियंत्रणात ठेवण्यासाठी या 5 गोष्टींचा करा आहारात समावेश

Health Tips : ऋतूमानानुसार आपल्या आहारात आणि आजूबाजूच्या परिस्थितीत बदल होत असतो. थंडीच्या दिवसात सुरुवातीच्या काळात बॅक्टेरिया, वायरस, फंगस यांच्या संसर्गाचा धोका असतो. यामुळे ताप, व्हायरल इन्फेक्शन, संसर्घ इत्यादींचे प्रमाण वाढते. या काळात शरीराच्या तापमानात झालेल्या बदलामुळे शरीरात संतुलन निर्माण होण्यास वेळ लागतो. आपल्या आहारात बदल करत काही गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे शरीराची झीज रोखून संतुलन तयार करता येते.

Diabetes control
मधुमेहावर नियंत्रण 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात आजूबाजूला अनेक बदल होतात
  • रक्तातील साखर वाढण्याबरोबर संसर्गाचा धोका
  • मधुमेहींसाठीचे सुपर फूड्स

Best Foods to Eat and Avoid with Diabetes: नवी दिल्ली : मधुमेहींसाठी रक्तातील साखरेचे नियंत्रण (Blood sugar control) करणे ही सर्वात महत्त्वाची बाब असते. रक्तातील साखरेचा आणि आपल्या आहाराचा थेट संबंध असतो. ऋतूमानानुसार आपल्या आहारात आणि आजूबाजूच्या परिस्थितीत बदल होत असतो. थंडीच्या दिवसात सुरुवातीच्या काळात बॅक्टेरिया, वायरस, फंगस यांच्या संसर्गाचा धोका असतो. यामुळे ताप, व्हायरल इन्फेक्शन, संसर्घ इत्यादींचे  प्रमाण वाढते. या काळात शरीराच्या तापमानात झालेल्या बदलामुळे शरीरात संतुलन निर्माण होण्यास वेळ लागतो. या बदलांमुळे जुने आजार असणाऱ्यांना त्रास होतो. अशावेळी मधुमेहींनी (Diabetes) आपल्या आहारात बदल करत काही गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे शरीराची झीज रोखून संतुलन तयार करता येते. शिवाय यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. मधुमेहींनी काय खावे हे जाणून घेऊया. (These super foods helps to control the diabetes in winter)

अधिक वाचा : बच्चू कडू-रवी राणा वाद मिटला? तब्बल अडीच तास बैठकीनंतर राणा म्हणाले हम साथ साथ है,हम दोस्त है'

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारे पदार्थ-

अंकुरलेले धान्य
अंकुरलेले संपूर्ण धान्य फायदेशीर असते. अंकुरित धान्य म्हणजे स्प्राउट्स हे सुपर फूड आहे. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने कमी होते. एक कप अंकुरित धान्यामध्ये फक्त 14 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय यामध्ये 6 ग्रॅम डायटरी फायबर असते. हे फायबर पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते.

अधिक वाचा : Bachchu Kadu : रवी राणामुळे आपण सरकारवर नाराज, आमदार बच्चू कडू यांचा आंदोलनाचा इशारा

दालचिनी चहा 
थंडीच्या काळात चहा किंवा कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय बनते. मात्र जर तुम्हाला मधुमेह असेल तर दालचिनीचा चहा घ्या. दालचिनीमध्ये फार कमी कार्बोहायड्रेट असतात. याशिवाय यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक असतात. हे घटक रक्तातील साखर कमी करण्यास फायदेशीर असतात. याशिवाय दालचिनीचा चहा हृदयाच्या विकारासाठीदेखील खूप उपयुक्त असतो.

रताळे 
रताळे जरी गोड असले तरी हे मधुमेहींसाठी योग्य अन्न आहे. रताळ्यामध्ये फोटोकेमिकल बीटा-कॅरोटीन असते जे व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. त्यामुळे रताळे डोळे आणि त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर असते.

अधिक वाचा - IAS Dance Video: महिला IAS चा डान्स व्हायरल, पाहा कोण आहे ही अधिकारी

भोपळ्याच्या बिया 
भोपळ्याच्या बियादेखील खूपच उपयुक्त असतात. यामध्ये मोठे जबरदस्त गुणधर्म असतात. त्यामुळेच मधुमेहींनी हिवाळ्यात भोपळ्याच्या बियांचे सेवन केले पाहिजे. शिवाय भोपळ्याच्या बियांमध्ये फारच कमी कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

काजू 
काजू हे मधुमेहींसाठी उत्तम ड्रायफ्रूट आहे. काजू केवळ हृदयरोगींसाठीच आरोग्यदायी नसून रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. काजूमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. शिवाय यात हेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. परिणामी यातून आरोग्य मिळते. 

या पदार्थांव्यतिरिक्त मधुमेही रुग्णांनी खोबरेल तेल, मासे, फ्लेक्ससीड, चिया बिया इत्यादींचे सेवन केल्याने त्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी