Super Foods for Winter : हिवाळ्याचा आनंद घेत निरोगी राहायचे आहे? मग हे पदार्थ नक्की खा

Winter Foods : हवेत बदल झाला की त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. हिवाळा आला की सर्दी, सर्दीसारखे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. मात्र काही आरोग्यदायी पदार्थ खाऊन आपण या आजारांपासून दूर राहू शकतो आणि हिवाळ्यातील थंडीचा आनंद घेऊ शकतो. हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी खायचे पदार्थ कोणते आहेत ते पाहूया.

Winter Foods
हिवाळ्यात निरोगी ठेवणारे पदार्थ 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात आरोग्याच्या समस्या उद्भवतात
  • हिवाळ्यात खायचे पदार्थ
  • तंदुरुस्त राहण्याच्या टिप्स

Healthy foods in winter : नवी दिल्ली : प्रत्येक ऋतुचे स्वत:चे वैशिष्ट्यं असते. ऋतू बदलला की अनेक गोष्टींमध्ये बदल होतात. खासकरून आपल्या आरोग्यावर (Health) या बदलांचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा बदलांमध्येही निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्यात काही बदल केले पाहिजेत किंवा त्याची खास काळजी घेतली पाहिजे. आता हिवाळा (Winter) आला की सर्दी, सर्दीसारखे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. मात्र काही आरोग्यदायी पदार्थ (Healthy Food) खाऊन आपण या आजारांपासून दूर राहू शकतो आणि हिवाळ्यातील थंडीचा आनंद घेऊ शकतो. आपण अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्‍हाला हिवाळ्यात (Winter Healthy Foods) उबदार ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया. (These super foods will keep you more healthy in winter read in Marathi)

अधिक वाचा - ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस स्थगित

हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी खायचे पदार्थ (Winter Healthy Foods)-

हळदीचे गरम दूध
दूधामध्ये अनेक पोषक घटक असतात. दुधापासून आपल्याला कॅल्शियम मिळते ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे हिवाळ्यात रोज गरम दूध प्या. खासकरून मुलांनाही गरम दूध द्या. यात आणखी औषधी फायदे मिळवण्यासाठी आणि रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही दुधात हळद मिसळूनही पिऊ शकता. हळदीचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हळदीचे आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवते.

अधिक वाचा - कधी आहे आहे दर्श अमावस्या 'या' दिवशी काय केल्याने होईल फायदा

अंडी आणि मासे
जर तुम्ही मांसाहारी असाल तर हिवाळा तुमच्यासाठी खाण्यापिण्याची चंगळ असलेला ऋतू असतो. कारण या काळात आपला जठराग्नी तीव्र असतो. त्यामुळे पचन चांगले होत असते. जर तुम्हाला हिवाळ्यात आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुमच्या जेवणात अंडी, मांस, मासे आणि चिकन यांचा समावेश केला पाहिजे. हे पदार्थ अनेक पोषक तत्त्वांनी युक्त असल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अंडी रोज खाऊ शकता. मात्र त्याचबरोबर महिन्यातून 2-3 वेळा मांसाहार करणे आवश्यक आहे.

सूप
सूप हा एक सोपा मात्र तितकाच पौष्टिक पदार्थ आहे. शिवाय गरम सूप प्यायल्यामुळे हिवाळ्यात ऊर्जेबरोबरच आरोग्यदेखील लाभते. म्हणूनच सूप हिवाळ्यात अगदी आवश्यक ठरते. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात असलेल्या भाज्यांमधून आपल्याला मुबलक प्रमाणात पोषक तत्व मिळतात. तुम्ही विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर करून सूप बनवू शकता. यात टोमॅटो, मशरूम, कॉर्न किंवा इतर कोणत्याही भाजीचा वापर करून सूप बनवू शकता. अलीकडे बाजारात तयार सूप मिळतात. मात्र घरी बनवले सूपच जास्त आरोग्यदायी असते.

अधिक वाचा - 277 धावा करत या फलंदाजाने क्रिकेट जगतात आणले वादळ, ठोकले 15 सिक्स

खिचडी
कोणत्याही ऋतूत आरोग्यासाठी फायदेशीर असणारा पदार्थ म्हणजे खिचडी. त्यातच हिवाळ्यात तर तो फारच उपयुक्त असतो. आपल्याकडे प्रत्येक घरात खिचडी खाल्ली जाते. खिचडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही खिचडी अनेक प्रकारे बनवू शकता. यात तुम्ही धान्य, दूधाचा वापर करू शकता. शिवाय चवीनुसार तुम्ही यात इतरही घटक वापरू शकता. खिचडी पचायला सोपी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते.  

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी