Diabetes superfoods: मधुमेह रोखण्यासाठी या आठ गोष्टी ठरतात रामबाण, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात

आपल्या शरीरातील रक्ताची पातळी नेहमीच नियंत्रणात राहावी आणि शरीराचं योग्य पोषणदेखील व्हावं, यासाठी काही सुपरफूड्स सुचवण्यात येतात.

Diabetes superfoods
मधुमेह रोखण्यासाठी या आठ गोष्टी ठरतात रामबाण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • खाण्यापिण्याच्या सवयींमुळेच वाढते साखरेची पातळी
  • काही पदार्थ ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर
  • मधुमेह टाळण्यासाठी काही पदार्थ ठरतात ‘सुपरफूड’

Diabetes superfoods: गेल्या काही वर्षांपासून बदललेली जीवनशैली (Lifestyle), चुकीची आहार पद्धती (Diet) आणि अपुरी झोप (Sleep) यासारख्या कारणांमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालल्याचं चित्र आहे. काहीजण सध्या मधुमेहावर औषध घेत आहेत तर काहीजणांच्या रक्तातील साखर वाढू लागली असून त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जर आपल्या शरीरातील साखरेच्या पातळीवर आपलं लक्ष नसेल तर अचानक साखर वाढल्याचं लक्षात येऊन धक्का बसू शकतो. आपल्या शरीरातील रक्ताची पातळी नेहमीच नियंत्रणात राहावी आणि शरीराचं योग्य पोषणदेखील व्हावं, यासाठी काही सुपरफूड्स (Superfoods) सुचवण्यात येतात. 

दालचिनी

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये बॉडी मास इंडेक्स कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग केला जातो. दालचिनीत अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. वेगवेगळ्या पदार्थांसोबत दालचिनीचा वापर केला जाऊ शकतो. दालचिनीमुळे शरीरातील लिपिडची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे साखरेची पातळी कमी होण्यासही मदत होते. 

भेंडी

भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेवोनोईड्स असतात. हे एक प्रकारचं अँटि ऑक्सिडंट आहे. यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर आरोग्यात सुधारणा होण्यासाठी मदत होते. भेंडीमध्ये पॉलीसेकेराईड नावाचा घटक मुबलक प्रमाणात असतो. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. 

अधिक वाचा - Alcohol Side Effects: दारुमुळे कामभावना कमी होतेच, शिवाय सुरू होतात ‘या’ लैंगिक समस्या; वाचा सविस्तर

योगर्ट

जर तुम्हाला रक्तातील साखऱेची पातळी कमी करण्याची इच्छा असेल तर मुबलक प्रमाणात फर्मेंटेस असणारं अन्न खाणं गरजेचं असतं. योगर्टमुळे हे काम सहज होतं. 

मोड आणि डाळी

सर्व प्रकारची कडधान्यं, डाळी आणि मोड यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचा समावेश असतो. यामुळे पचनाचा वेग काहीसा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे प्रोसेस केलेले पदार्थ खाण्यामुळे अचानक रक्तातील साखर वाढत नाही. 

शेंगदाणे

शेंगदाण्यामध्ये विविध प्रकारची पोषक तत्त्वं असतात. रोजच्या आहारात शेंगदाण्याचा समावेश केल्यामुळे रक्तातील साखर कमी व्हायला आणि नियंत्रणात राहायला मदत होते. त्यामुळे रोज मूठभर तरी शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. 

अधिक वाचा - Breathing Pattern: श्वास घेण्याची पद्धत बदला, आयुष्य बदलेल!

अंडी

अंड्यांना प्रसिद्ध सुपरफूड मानलं जातं. अंड्यातही अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. इन्सुलिनची सेन्सेटिव्हिटी कमी करण्याची क्षमता अंड्यांमध्ये असते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहायला मदत होते. 

होल ग्रेन

जर तुम्हाला साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याची इच्छा असेल तर ओट्स, किनोआ, गहू यासारख्या होल ग्रेनची मदत घेऊ शकता. हे अन्नपदार्थ तुम्ही रोजच्या रोज खाऊ शकता. 

डिस्क्लेमर - रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याबाबच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत गंभीर समस्या अथवा शंका असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी