Skin Care : चेहऱ्याला कधीच लावू नका या 6 गोष्टी, त्वचा होईल खराब

त्वचा चांगली ठेवण्यासाठी अनेक घरगुती पदार्थांचा वापर केला जातो. मात्र त्यातील काही पदार्थ हे त्वचेसाठी हानीकारक असतात.

Skin Care
चेहऱ्याला कधीच लावू नका या 6 गोष्टी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या गोष्टी ठरतात त्वचेच्या आरोग्यासाठी घातक
  • घरगुती असल्या तरी चेहऱ्यापासून ठेवा लांब
  • संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी घ्या अधिक काळजी

Skin Care : त्वचा आरोग्यपूर्ण (Healthy Skin) राहण्यासाठी त्याची काळजी (Skin Care) घेणं गरजेचं आहे. त्यासाठी अनेकजण नैसर्गिक गोष्टी (Natural Things) वापरण्याला प्राधान्य देतात. बाजारात मिळणाऱ्या स्कीन केअर प्रॉडक्टमध्ये (Products) केमिकल (Chemical) असण्याची शक्यता गृहीत धरून जास्तीत जास्त घरगुती गोष्टींचा वापर करून स्कीन केअर करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. नियमितपणे चेहऱ्याला आणि त्वचेला घरगुती आणि सैंद्रीय गोष्टी वापरून मसाज करणे, काही गोष्टींचा लेप देणे यासारखे उपाय केले जातात. मात्र हे करताना अनेकदा अशा काही वस्तूंचा आणि पदार्थांचा वापर केला जातो, जे चेहऱ्यासाठी पोषक नसतात. मात्र ही बाब माहिती नसल्यामुळे त्यांचा सर्रास वापर केला जातो आणि चेहऱ्याचं, त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया अशाच काही वस्तूंविषयी. 

लिंबू

लिंबू हे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असणारं फळ आहे. त्वचा चमकदार बनवण्यासाठी आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी लिंबाचा वापर करण्यात येतो. मात्र त्यात काही ॲसिडिक गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावर खाज सुटणे, ॲलर्जी होणे यासारखे विकार जडण्याची शक्यता असते. 

साखर 

त्वचा स्क्रब करण्यासाठी अनेकजण साखरेचा वापर करतात. साखर ही एक उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करते. मात्र आपली त्वचा ही प्रचंड संवेदनशील असते. साखर आपल्या त्वचेचं नुकसान करू शकते. साखरेचा जास्त वापर केला तर आपली त्वचा ड्राय होण्याची शक्यता अधिक असते. 

अधिक वाचा - Yoga for eyes : ही तीन योगासनं ठरतील डोळ्यांसाठी वरदान, बसल्या बसल्या होईल व्यायाम

मीठ

मिठाचा वापर करून त्वचेवर असणारी आणि झाकली गेलेली छिद्रं उघडी व्हायला मदत होते, असं सांगितलं जातं. मात्र मिठाचे बारीक बारीक कण त्वचेचं नुकसान करण्याची शक्यताच अधिक असते. मिठामुळे त्वचेला खाज सुटण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मिठात असणाऱ्या गुणधर्मामुळे त्वचेला जळजळ होण्याचीही दाट शक्यता असते. 

टूथपेस्ट

अनेक लोक चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स वगैरे दूर करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करताना दिसतात. मात्र टूथपेस्टमध्ये असे काही घटक असतात जे खाज आणि जळजळ वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्वचेवर असणाऱ्या संरक्षक थराचंही यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Foot pains : पाय दुखण्याची असू शकतात ही महत्त्वाची कारणं, साध्या उपायांनी सुटेल समस्या

बेकिंग सोडा

ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी बेकिंग सोड्यापासून चार हात लांबच राहण्याचा सल्ला दिला जातो. चुकून जरी तुम्ही बेकिंग सोडा थेट चेहऱ्याला लावलात, तर त्याचा त्वचेवर विपरित परिणाम होण्याची शक्यताच अधिक असते. चेहऱ्यावरील डाग दूर करण्याऐवजी त्यामुळे अधिकच वाढू शकतात. 

विनेगर

विनेगर चेहऱ्यासाठी घातक असतं. अनेकजण चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी विनेगरचा वापर करतात, मात्र त्यामुळे त्वचेवर कायमस्वरूपी डाग उमटण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर - यातील सर्व उपाय या सामान्य आणि घरगुती स्वरुपाच्या टिप्स आहेत. तुम्हाला त्वचेशी संबंधित काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी