Navratri 2020: नवरात्री उपवासादरम्यान वजन कमी करण्यासाठी वापरा या टिप्स

तब्येत पाणी
Updated Oct 20, 2020 | 16:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navratri 2020: नवरात्रीच्या उपवासादरम्यान वजन कमी करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हेल्दी पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. ज्यामुळे तुमची इम्युनिटी मजबूत राहील आणि तुम्ही वजन कमी करू शकता. 

fast
नवरात्री उपवासादरम्यान वजन कमी करण्यासाठी वापरा या टिप्स 

थोडं पण कामाचं

  • नवरात्रीच्या व्रतादरम्यान तुम्ही जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करा
  • नवरात्रीत तळलेले पदार्थ खाण्याऐवजी केवळ भाजलेले पदार्थ खा
  • ब्रेकफास्टमध्ये तुम्ही रात्री भिजवलेला सुका मेवा खाऊ शकता.

मुंबई: जे लोक वाढत्या वजनाने(weight gain) त्रस्त आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे. तुम्ही नवरात्रीत उपवास(navratri fast) करून तुमचे वजन घटवू शकता. नवरात्रीत(navratri 2020) अनेक लोक उपवास करतात. नवरात्र हा हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. याला दुर्गा पुजा असेही म्हटले जाते. नवरात्रीदरम्यान देवीच्या ९ विविध रूपांची पुजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस खूप पवित्र मानले जातात. या दरम्यान लोक देवीच्या ९ रूपयांची आराधना करत त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. 

अशी मान्यता आहे की या नऊ दिवसांत भक्ती भावाने आणि निर्मळ मनाने जे देवीची पुजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. काही देवीचे भक्त या नऊ दिवसांमध्ये उपवासही करतात. यावेळी ते मासांहारी भोजन, दारू, कांदा, लसू आणि अनेक प्रकारची धान्ये, डाळी, मसाले यांचे सेवन टाळतात. तसेच केवळ उपवासाचेच पदार्थ खातात. व्रत करत असताना आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष दिले पाहिजे. यावेळेस साधे जेवण केले पाहिजे. ज्यामुळे वजनही वाढणार नाही आणि आपण हेल्दी राहू. 

व्रत करत असताना अधिकाधिक हेल्दी जेवणाचे सेवन केले पाहिजे. यामुळे आपली इम्युनिटीही मजबूत राहील तसेच वजनही नियंत्रणात राहील. 

व्रतादरम्यान वजन कमी करा या डाएट चार्टने

ब्रेकफास्ट - ब्रेकफास्टमध्ये तुम्ही रात्री भिजवलेला सुका मेवा खा. यासोबतच सफरचंद आणि ड्राटफ्रुट दुधाचे सेवन करा. यामुळे दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहील. तसेच सतत भूकही लागणार नाही. यामुळे अधिक खाल्लेही जाणार नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राखण्यास मदत होईल. 

दुपारच्या जेवणाआधी - व्रतादरम्यान आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी ताक, लस्सी, नारळ पाणी अथवा फळांचा ज्यूस तुम्ही पिऊ शकता. सोबतच लिंबू पाणी, ग्रीन टीचाही वापर करू शकता. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि वजनही कंट्रोलमध्ये राहील. 

लंच - नवरात्रीच्या व्रतामध्ये लंचमध्ये तुम्ही जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करा. याोबतच दही आणि साबुदाणा तसेच राजगिऱ्याची पुरी आणि चाटच्या ऐवजी राजगिऱ्याची पोळी आणि त्यानंतर एक कप ग्रीन टीचे सेवन करा.

संध्याकाळचा नाश्ता - व्रतादरम्यान तुम्ही भाजलेले शेंगदाणे, अक्रोड, मखाणे आणि किशमिशचा वापर करू शकता. दरम्यान, मार्केटमध्ये उपलब्ध असलेले स्नॅक्सचे सेवन करू नका. यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते. जे तुमचे वजन वाढवू शकते. 

रात्रीचे जेवण - नवरात्रीत तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेल्या पदार्थांचा समावेश करा. यासोहतच रात्री उकडलेले रताळे आणि दही खाऊ शकता. तसेच भाज्या केवळ उकडून खा यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील आणि वजनही नियंत्रणात राहील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी