Sleeping Tips: टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वापरून पाहाच

Sleeping tips in marathi: कामाच्या तणावामुळे अनेकांना रात्री झोप लागत नाही. तुम्हालाही अशीच समस्या जाणवतेय का? मग काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला निवांत झोप लागेल. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

simple steps for better sleep: धकाधकीच्या दिवसात तुम्हाला फ्रेश राहणे खूपच गरजेचे आहे. चांगल्या झोपेसाठी तुमचं मनही फ्रेश असणं आवश्यक आहे. तसेच तुम्ही तणावमुक्त असायला हवेत. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुम्हाला व्यवस्थित झोप लागत नाही. तुम्ही तणावात आहात हे तुम्हाला लक्षात येण्यापूर्वीच तुमच्या शरीराला जाणवते. ही प्रक्रिया इतकी जलद होते की तुम्हाला लक्षातही येत नाही. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा तुमच्या पोटात काहीवेळा गोळा येतो किंवा श्वासोच्छवास वेगाने घेण्यास सुरुवात करता. तणावात असताना शांत झोपेसाठी नेमके काय करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (these tips will help you to take sweet dreams in night read sleeping tips in marathi)

नियमित व्यायाम

एनसीबीआयमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका स्टडीनुसार, दररोज व्यायाम केल्याने शरीरात तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचा प्रभाव कमी करुन शरीरातील हॅप्पी हार्मोन्सचे प्रमाण वाढते. हे तुम्हाला रात्री शांत झोप येण्यास मदत करतात. यासोबतच तुमचे आरोग्यही सुदृढ राहते. 

रात्री अल्कोहोलचे सेवन टाळा

अल्कोहोल हे झोपेत अडथळा आणण्यास कारणीभूत ठरते. यात असे रसायन असते जे तुमच्या मेंदूला असे भासवते की थकलेला नाहीये. यानंतर हेच संकेत मेंदू तुमच्या संपूर्ण शरीराला पाठवतो. परिणामी तुम्ही रात्रभर जागे राहता.

हे पण वाचा : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

हर्बल चहा

स्पीप फाऊंडेशननुसार, जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास जाणवत असेल तर हा त्रास कमी करण्यास हर्बल टी खूपच फायदेशीर ठरू शकते. यामधील घटकांमुळे शरीराला खूपच आराम मिळतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

तणावाची कारणे

असे म्हटले जाते की, तुमच्या समस्या तुम्ही एका कागदावर लिहिल्या तर त्या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम तुमचा मेंदू करु लागतो. त्यामुळे तुम्ही तणाव किंवा समस्यावर रात्रभर विचार न करता शांत झोपाल.

हे पण वाचा : हिवाळ्यात चुकूनही खाऊ-पिऊ नका हे 6 पदार्थ

रात्री जाग आल्यास...

तणाव किंवा चिंतेत असल्यास तुम्हाला रात्री अचानक जाग आली आणि पुन्हा झोप लागत नसेल तर अशा परिस्थितीत बेडवर पडून झोप येण्याची वाट पाहू नका तर काहीतरी बोअरिंग काम करा. ज्यामुळे तुम्ही कंटाळून थकवा जाणवेल आणि झोप येऊ लागेल.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. झोप येण्यासाठी हे उपचार नाहीत तर त्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य ते मार्गदर्शन घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी