Weight Loss : जर तुमचे सातत्याने वजन वाढत असेल तर त्याला अनेक कारणे आहेत. त्यात चुकीचा डाएट, खाण्याच्या सवयी, लाईफस्टाईल आणि मनावरील ताण ही कारणे असू शकतात. फक्त व्यायाम करून वजन कमी होणार नाही त्यासाठी योग्य डाएटही असला पाहिजे. जर महिन्याला ५ किलो वजन कमी करायचे असेल तर हा डाएट प्लॅन फॉलो करा.
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपायही करता येतील. पुढील डाएट प्लॅन फॉलो केल्यास एका महिन्यात तुमचे ५ किलो वजन कमी होईल. हा डाएट प्लॅन नियमित फॉलो केल्यास नक्कीच फायदा होईल.
आज आपण अशा डाएट प्लॅनबद्दल जाणून घेऊ ज्यामुळे तुम्ही एका महिन्यात ३ ते ४ किलो वजन कमी करू शकता. परंतु प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळं असतं. त्यामुळे हा डाएट प्लॅन फॉलो करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
नाश्टा : सकाळी नाष्ट्याच्यावेळी २ ईडली आणि सांबार घ्यावे. तसेच ४ बदाम आणि ग्रीन टी चा आहार घ्यावा. तसेच यावेळी आवर्जून फळं खावीत.
दुपारचे जेवण: २ चपत्या आणि डाळ, काही वेळानंतर थंडगार ताक प्यावे. सांयकाळी उकडलेली कडधान्ये खावीत्ग.
रात्रीचे जेवण : भाजी आणि दोन चपात्या तसेच दही आणि सलाड खावे
सकाळी उठल्यानंतर मेथीचे पाणी प्यावे.
नाष्टा : मुगडाळीपासून बनवलेले २ क्रेप्स, ४ बादाम आणि ग्रीन टी घ्यावी
नाष्टा आणि दुपारच्या जेवणादरम्यान फळं खावी.
दुपारचे जेवण : भाजी आणि दोन चपात्या तसेच सलाड आणि दही घ्यावे.
दुपरच्या जेवणानंतर नारळ पाणी प्या.
रात्रीचे जेवण: मशरूम, दोन चपाती आणि पालक खावे
सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी प्यावे
नाष्टा : सकाळी उथल्यानंतर एक वाटी ओट्स घ्यावे. चार बादाम आणि ग्रीन टी घ्यावी.
नाष्ट्यानंतर दुपरच्या जेवणापुर्वी एक ग्लास फळाचा रस घ्यावा.
दुपारचे जेवण : घेवण्याची भाजी, एक चपाती आणि दही भात खावा.
रात्रीचे जेवण : दोन चपात्या आणि डाळ तसेच सलाड खावे.
सकाळी उठल्यावर एक ग्लाल लिंबू पाणी प्यावे.
नाष्टा : उपमा, दोन बदाम आणि ग्रीन टी घ्यावी.
नाष्ट्यानंतर आणि दुपारच्या जेवणापूर्वी फळं खावीत.
दुपारचे जेवण : भाजी आणि दोन चपात्या तसेच सलाड आणि दही घ्यावे.
त्यानंतर काहीवेळाने नारळ पाणी प्यावे
रात्रीचे जेवण : एक चपाती आणि भाजी आणि डाळीचा आहार घ्यावा.