Weight Loss : तीस मिनिटे व्यायाम अन् आठ तास झोप महिन्याला कमी करेल 1.5 किलो वजन

वजन वाढणे (weight gain) ही आजकालच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यामुळे मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, कोरोना व्हायरससह अनेक गंभीर आजारांचा धोका असू शकतो. वजन कमी करण्यासाठी काही नियम असतात आणि त्यांचे पालन न केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकत नाहीत. 

Weight Loss
तीस मिनिटे व्यायाम अन् आठ तास झोप महिन्याला कमी करेल वजन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 21 दिवसात 1 किलोपेक्षा जास्त वजन कमी करू शकतो.
  • नियमांचे पालन केल्याने तुमचे वजन कमी होण्यास तर मदत होईलच शिवाय केस वाढवण्यासाठी, चेहरा/त्वचा चमकवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल.
  • 21 पैकी किमान 18 दिवस तरी इंटरमिटेंट फास्टिंग करा.

नवी दिल्ली : वजन वाढणे (weight gain) ही आजकालच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यामुळे मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, कॅन्सर, कोरोना व्हायरससह अनेक गंभीर आजारांचा धोका असू शकतो. वजन कमी करण्यासाठी काही नियम असतात आणि त्यांचे पालन न केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकत नाहीत. 

वजन कमी करण्याच्या दृष्टीने जेवढं वर्कआउट आवश्यक आहे, तेवढीच आहाराची काळजी घेणे सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्हाला कठोर परिश्रम न करता आणि फक्त 21 दिवसात 2 पौंड म्हणजे सुमारे 1 किलोपेक्षा जास्त वजन कमी करायचे असेल तर तुम्ही इथे दिलेले काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

21 दिवसांत कमी होईल 1.5 किलो वेटलॉस

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल पण तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची इच्छा नसेल तर काही नियम आहेत, त्यांची काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. या नियमांचे पालन करून आपण 21 दिवसात 1 किलोपेक्षा जास्त वजन कमी करू शकतो. याशिवाय तुम्हाला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या देखील हलके वाटेल.

कोणते नियम व कोणते फायदे?

तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नियमांचे पालन केल्याने तुमचे वजन कमी होण्यास तर मदत होईलच शिवाय केस वाढवण्यासाठी, चेहरा/त्वचा चमकवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, आम्लपित्त/अॅसिडीटी, गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी मदत मिळू शकते. 

हे आहेत नियम

इंटरमिटेंट फास्टिंग 

21 पैकी किमान 18 दिवस तरी इंटरमिटेंट फास्टिंग करा. याचा अर्थ तुम्ही 8 तास खायचं आणि 16 तास उपवास करायचा अर्थात उपाशी राहायचं. 

फक्त 30 मिनटे व्यायाम 

तुम्ही कोणत्याही प्रकारातील तुमच्या आवडीचा व्यायाम फक्त तीन मिनिटांसाठी करु शकतात. वॉक, योग, प्राणायाम, स्किपिंग, झुंबा डान्स, सायकलिंग, पॉवर योगा किंवा इतर काहीही असू शकते

या गोष्टींपासून राहा लांब 

जंक फूड्स, प्रक्रिया केलेली साखर, तळलेले आणि फास्ट फूड 15 दिवसांच्या अंतराशिवाय अजिबात खाऊ नयेत. पिझ्झा, बर्गर, केक, चॉकलेट यापासून दूर राहावे. 

लवकर झोपा व लवकर उठा 

दररोज 7 ते 8 तास झोपा आणि नियमितपणे सकाळी 8 च्या आधी उठा. दररोज भरपूर पाणी प्या. सॉफ्ट ड्रिंक्स, साखर आणि सोडा असलेले फळांचे ज्यूस पिणं टाळा.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी