Brain Exercise: केवळ २ मिनिटे करा हा व्यायाम, कम्प्युटरपेक्षा वेगवान होईल मेंदू

तब्येत पाणी
Updated Nov 11, 2021 | 18:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Exercise for brain: शरीराला पूर्णपणे फिट ठेवण्यासाठी आपल्या मेंदूचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे असते. जाणून घ्या मेंदूला तल्लख बनवणारा व्यायाम

brain
दोन मिनिटे करा हा व्यायाम, कम्प्युटरपेक्षा वेगवान होईल मेंदू 
थोडं पण कामाचं
 • तणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागली आहे
 • मेंटल हेल्थ एक्सपर्टने मेंदूला कम्प्युटरपेक्षा वेगवान बनवायचे असेल २ मिनिटांची एक्सरसाईज फायजेशीर ठूरू शकते.
 • जे करण्यासाठी तुम्हाला केवळ २ मिनिटे लागतील. मात्र याचा फायदा संपूर्ण दिवस मिळेल. 

मुंबई: संपूर्ण शरीराला जर फिट(fit) ठेवायचे असेल तर फिजीकलसोबतच मेंटल हेल्थही(mental health) चांगली राखणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम करण्यासाठी जितकी शारिरीक(physically) गरज असते तितकी मानसिकही(mentally). जेव्हा मेंदू(brain) मसल्सना(muscle) सिग्नला पाठवतो तेव्हा आपले स्नायू काम करतात. मात्र तणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे मेंदूची क्षमता(brain capacity) कमी होऊ लागली आहे. मेंटल हेल्थ एक्सपर्टने मेंदूला कम्प्युटरपेक्षा वेगवान बनवायचे असेल २ मिनिटांची एक्सरसाईज(exercise) फायजेशीर ठूरू शकते. थेरपिस्ट आणि काऊन्सलेर Sarla Totlaने सोशल मीडियावर सोप्या पद्धतीची एक्सरसाईज सांगितली आहे. जे करण्यासाठी तुम्हाला केवळ २ मिनिटे लागतील. मात्र याचा फायदा संपूर्ण दिवस मिळेल. This 2 minute brain exercise will help for your mental health

श्वासाचा व्यायाम

Sarla Totla ने सांगितले की श्वासाचा व्यायाम केल्याने तुम्ही तणावापासून मुक्ती मिळवू शकता आणि फोकसही वाढण्यास मदत होते. मात्र तुम्ही धावपळीच्या वेळेतही हे करू शकता. तल्लख मेंदूसाठी श्वासाचा व्य्याम करा. 

 1. सगळ्यात आधी आरामदायक स्थिती बसा
 2. आत आपले खांदे रिलॅक्स करा आणि छातीसमोर ठेवा. 
 3. हळूहळू दीर्घ आणि लांब श्वास घ्या.
 4. संपूर्ण श्वास घेतल्यानंत काही सेकंद श्वास रोखण्याचा प्रयत्न करा. 
 5. हा व्यायाम केवळ २ मिनिटे करा. 

चांगल्या मेंदूसाठी अन्य गरजेच्या टिप्स

एक्सपर्ट्स सांगतात की मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी श्वासाच्या व्यायामासोबतच काही टिप्सही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जसे

 1. मल्टी टास्किंग करू नका. एका वेळेस एकाच कामावर लक्ष द्या
 2. दुसऱ्या दिवशी गरजेच्या असलेल्या कामांची आदल्या रात्रीच लिस्ट बनवा. 
 3. जेव्हा एखादे काम पूर्ण होईल तेव्हा लिस्टमधून नाव हटवा. 
 4. पुरेशी झोप घ्या आणि सकारात्मक राहा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी