मुंबई: साधारणपणे गोरेपणा मिळवण्याठी फेशियल(facial), स्क्रबिंग(scrubbing) आणि मसाज ट्रीटमेंटसारखे उपाय केले जातात. मात्र जेव्हा मानेची गोष्ट येते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही. आपल्या बेपर्वाईमुळे आपल्या मानेकडची स्किन डार्क होते. मानेकडची स्किन काळी पडण्याचे कारण हायपरपिगमेंटेशन असू शकते. अनेकदा मान काळी पडण्याचे कारण तुमची उशी आणि ऑईलिंगही असू शकते. तुम्ही तेल लावून झोपत असाल तर मानेची नीट सफाई करत नसाल तर तुमची मान काळी पडू लागते. This 3 home remedies will help to cure neck darkness
अधिक वाचा - Air Force चा जवान हनी ट्रॅपमध्ये अडकला, पोलिसांकडून अटक
Acanthosis Nigricans च्या रूपात ओळखले जाणारे हार्मोनल कंडिशन मानेजवळची स्किन काळी करतात. हार्मोनल कंडीशनमुळे त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी डॉक्टरांच्या उपायाची गरज असते. जर तुमची मान सूर्याच्या किरणांच्या संपर्कात आल्याने आणि योग्य साफसफाई न झाल्याने काळी पडत आहे तर तुम्ही मानेचा काळेपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
अँटीऑक्सिडंटनी भरपूर असलेला अॅलोव्हेरा मानेचा काळेपणा कमी करते. यामुळे स्किन हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच त्वचेचा उजळपणा वाढतो.
अॅलोव्हेराचा ताजी पाने घ्या आणि पानातून गर बाहेर काढा. हे जेल सरळ तुमच्या मानेवर लावा. हळू हळू मसाज करा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. तुम्ही हा उपाय नियमितपणे करू शकता.
मानेच्या काळवंडण्यापासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू आणि मधाची पेस्ट लावा. एक चमचा लिंबूच्या रसासह एक चमचा मध मिसळा. ही पेस्ट मानेवर लावा आणि त्यानंतर ओल्या कपड्याने साफ करा.
अॅपल सिडार व्हिनेगारही स्किनचा पीएच संतुलित ठेवण्याचे काम करतो. यातील मॅलिक अॅसिड स्किनवरून डेड सेल्स हटवतात आणि स्किनला नैसर्गिक ग्लो देतात.
अधिक वाचा - तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे
दोन मोठे चमचे अॅपल सिडार व्हिनेगार आणि चार मोठे चमचे पाणी घ्या. ते नीट मिक्स करा.यानंतर एक कॉटन बॉल घ्या आणि यात बुडवा. दहा मिनिटे तसेच स्किनला लावून ठएवा. मानेचा काळेपणा करण्यासाठी तुम्ही दररोज याचा वापर करू शकता.