Lose Belly Fat: पोटाची चरबी कमी करण्याचे आणि वजन कमी कऱण्यासाठी ३ रामबाण उपाय

तब्येत पाणी
Updated Oct 13, 2020 | 17:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Belly fat: तुम्ही असे अनेकजण पाहिले असतील ज्यांनी अनेक किलो वजन कमी केले आहे मात्र पोटावरची चरबी काही घटवू शकलेले नाहीत. 

weight loss
Lose Belly Fat: वजन कमी कऱण्यासाठी ३ रामबाण उपाय 

थोडं पण कामाचं

  • वजनासोबतच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ओवा खाऊ शकता
  • दालचिनीचा वापर तुम्ही वजन कमी करण्यातही करू शकता.
  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य डाएट फॉलो करत आहात तर तुम्ही योग्य पद्धतीने वजन कमी करत आहात

मुंबई: वाढते वजन(weight gain) सध्या सामान्य समस्या बनली आहे. याचे कारण बदलती आणि सुस्त जीवनशैली(bad lifestyle). आजकाल सुस्त लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे(wrong diet) लोकांमध्ये लठ्ठपणाची(obesity) समस्या वाढत आहे. लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हा लठ्ठपणा दुसऱ्या आजारांचे कारण बनत आहे. तुम्ही जर वेळेतच तुमचे वजन नियंत्रणात ठेवले नाही तर वजन वाढण्यास वेळ लागणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला योग्य डाएट आणि चांगला आहार घेणे गरजेचे असते. जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करत आहात आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य डाएट फॉलो करत आहात तर तुम्ही योग्य पद्धतीने वजन कमी करत आहात. 

अनेकदा लोक वजन कमी करूनही त्यांची पोटाची चरबी काही कमी करत नाही. मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. जाणून घ्या यावरचे घरगुती उपाय ज्यामुळे तुम्ही पोटावरची चरबी कमी करू शकता. 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी भोजन

पोटावरची चरबी कमीकऱण्यासाठी सगळ्यात गरजेचा आहे संतुलित आहार. आपल्या आहारात असा गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतील. कारण आता थंडीचे दिवस आहात त्यामुळे बाजारात गाजर तसेच हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. गाजरामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे पोषकतत्वे असतात. तसेच बीन्स या पोषकतत्वांचा खजिना आहे. हे दोनही पदार्थ तुम्ही तुमच्या सलाडमध्ये समाविष्ट करू शकता. जेवणाच्या ३० मिनिटेआधी तुम्ही सलाड खाल्ल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. यासोबतच लेमन टी अथवा ग्रीन टीही घेऊ शकता. 

वजन कमी करण्यासाठी खा ओवा

वजनासोबतच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ओवा खाऊ शकता. यासाठी तुम्ही ओव्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. यासाठी रात्री एक कप पाण्यात ओवा भिजत घाला आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी हे पाणी प्या. 

पोटावरची चरबी कमी करणार दालचिनी

दालचिनी डायबिटीज कमी करण्यास फायदेशीर असल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र आम्ही तुम्हाला सांगतोय की दालचिनीचा वापर तुम्ही वजन कमी करण्यातही करू शकता. जर तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुम्ही एका दगडात दोन पक्षी मारू शकता. यासाठी तुम्हाला मधाची गरज पडेल. जर दालचिनी आणि मध एकत्रित मिसळून घेतल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी