food for anti ageing, immunity booster: हे ५ पदार्थ तुम्हाला ठेवतील चिरतरूण

तब्येत पाणी
Updated Dec 10, 2021 | 13:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

superfood which help to anti ageing: आपण दररोज जे काही खात असतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असते. वयानुसार आपल्या त्वचेत बदल होत असतो. जसजसे वय वाढत जाते तसे वाढलेले वय आपल्या चेहऱ्यावरून दिसते. मात्र तुम्हाला असे काही सुपरफूड्स माहीत आहेत का जे तुम्हाला चिरतरूण ठेवण्यात मदत करतील.

anti ageing
हे ५ पदार्थ तुम्हाला ठेवतील चिरतरूण 
थोडं पण कामाचं
  • सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. 
  • आपल्या रोजच्या खाण्यात असे पदार्थ आहेत जे आपले वय रोखू शकतात. 
  • दररोज्या जेवणातील पदार्थांनी आपण हेल्दी लाईफ जगू शकतो. 

मुंबई: सध्या सगळ्यांचीच जीवन शैली'9fast lifestyle) खूप व्यस्त झाली आहे. त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. ज्यांची रोगप्रतिकार क्षमता(immunity system) कमी आहे त्यांना आजार पटकन होतात. अशातच शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. कोरोना काळात(corona) तर शरीराची इम्युनिटी वाढवणे प्रचंड गरजेचे होते. मुलांमध्ये तसेच वयस्कर लोकांमध्ये इम्युनिटी सिस्टीम कमजोर असते. अशा वेळेस त्यांनी खानपानावर लक्ष देणे गरजेचे असते. 

इम्युनिटी वाढवण्यासाठी तसेच अँटीएजिंग साठी खा हे ५ पदार्थ

लसूण

लसूणमध्ये अनेक प्रकारचे अँटी व्हायरल तत्वे असतात. सूप अथवा सलादशिवाय तुम्ही कच्चा लसूणही खाऊ शकता. एक चमचा मधासह लसणाचे सेवन केल्याने तुमची इम्युनिटी सिस्टीम बूस्ट होण्यास मदत होते. तसेच ज्यांना हाय ब्लड प्रेश आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी लसणीचे सेवन करावे. दिवसाला लसणीच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने आरोग्यास खूप फायदा होतो. तसेच त्वचेसाठीही याचा फायदा होतो. 

भोपळ्याच्या बिया 

लहानपणी तुम्ही अनेकदा भोपळ्याची गोष्ट ऐकली असेल. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मात्र हा भोपळा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. या भोपळ्याच्या बिया आरोग्यास अतिशय फायदेशीर असतात. भोपळ्याच्या बिया अशाच अथवा रोस्टेड स्वरूपात खाल्ल्या जातात. हृदयाच आरोग्य, निद्रानाश, सारखेचा ताळमेळ, ब्लड प्रेशर असा त्रास असल्यास या बिया जरूर खाव्यात. यात मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. यात मोठ्या प्रमाणात झिंक असते. 

हर्ब्स आणि मसाले 

हर्ब्स आणि मसाले यांच्यात इम्युनिटी वाढवण्यासाठीचे घटक असतात. आपल्या भारतीयांच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा वापर होतो. त्यामुळे इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते. मसाल्यातील हळद ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. हळदीमध्ये अँटी इन्फामेंट्री गुण असतात. त्यातील करक्युमिन मांसपेशी मजबूत करण्याचे काम करतात. यात अंटी एजिंग प्रॉपर्टीजही असतात. 

किवी 

डेंग्यूमुळे पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर डॉक्टरांकडून किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. किवीमधून तुमच्या शरीराला व्हिटामिन सी मिळते. दोन किवी खाल्ल्याने १६० मिलिग्रॅम किवी मिळते. व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते म्हणून आंबट फळे खाण्याा सल्ला दिला जातो. 

कोको 

चॉकलेट खायला कोणाला आवडत नाहीत. कोकोच्या बियांपासून चॉकलेट बनवले जाते. माज्ञ तुम्हाला माहीत आहे का या कोकोच्या बियांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याची ताकद असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी